S M L

लहानपणीच्या 'या' मैत्रिणीशी एड शीरन करणार लग्न!

सगळ्यांना प्रेमात पडणारा ब्रिटिश गायक एड शीरननं कोणाच्या प्रेमात पडला? हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत. पण त्यांची आतूरता एडनं संपवली आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 21, 2018 09:10 PM IST

लहानपणीच्या 'या' मैत्रिणीशी एड शीरन करणार लग्न!

21 जानेवारी : सगळ्यांना प्रेमात पडणारा ब्रिटिश गायक एड शीरननं कोणाच्या प्रेमात पडला? हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते आतूर आहेत. पण त्यांची आतूरता एडनं संपवली आहे. तो लहान पणाची प्रेमिका चेरी सीबोर्नशी लग्न करणार असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं आहे. त्यानं शनिवारी सकाळी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या चाहत्यांना ही बातमी दिली. त्यामुळे तो कधी लग्न करणार हे जाणून घेण्यासाठी त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

एडने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहंल की, 'नवीन वर्षाच्या अगदी अगोदर मला माझी बायको मिळाली आहे. आम्ही दोघे खूप खुश आहोत आणि एकमेकांच्या खूप प्रेमातही आहोत.' सीबोर्नला मी लहानपणापासून ओळखतो असं मागच्याच वर्षी एडनं सांगितलं होतं.

'शेप ऑफ यू' या एड शीरनंच्या गाण्यानं अवघ्या देशावर जादू केली होती. त्याच्या आवाजाचे चाहते अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतातही पहायला मिळतात. सगळ्या तरुणाईला भूरळ पाडणार एड शीरनं आता लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

Loading...

Got myself a fiancé just before new year. We are very happy and in love, and our cats are chuffed as well xx

A post shared by Ed Sheeran (@teddysphotos) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 21, 2018 08:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close