मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Meghan Markle सह शरीर संबंधाचा दावा करण्यासाठी मिळाली होती 53 लाखांची ऑफर; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

Meghan Markle सह शरीर संबंधाचा दावा करण्यासाठी मिळाली होती 53 लाखांची ऑफर; अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

एका अभिनेत्याच्या धक्कादायक खुलाशामुळे मेगन मार्कल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मेगन मार्कलचा सहकलाकार सायमन रेक्स (Simon Rex and Meghan Markle) याने आश्चर्यकारक असा खुलासा केला आहे.

एका अभिनेत्याच्या धक्कादायक खुलाशामुळे मेगन मार्कल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मेगन मार्कलचा सहकलाकार सायमन रेक्स (Simon Rex and Meghan Markle) याने आश्चर्यकारक असा खुलासा केला आहे.

एका अभिनेत्याच्या धक्कादायक खुलाशामुळे मेगन मार्कल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मेगन मार्कलचा सहकलाकार सायमन रेक्स (Simon Rex and Meghan Markle) याने आश्चर्यकारक असा खुलासा केला आहे.

मुंबई, 20 मार्च: पूर्वाश्रमीची हॉलिवूड अभिनेत्री आणि प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगन मार्कल (Meghan Markle latest News) अनेकदा चर्चेत असते. 2018 मध्ये मेगनने जेव्हा प्रिन्स हॅरीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून मेगनबद्दल अनेक नकारात्मक बातम्या तसंच अफवांचा प्रसार झाल्याचं पाहायला मिळालं. या कपलवर टीका देखील झाली. हे रॉयल लग्न करण्यापूर्वी मेगन एक यशस्वी हॉलिवूड अभिनेत्री होती. दरम्यान या मनोरंजन क्षेत्रातील काही गोष्टी अद्यापही तिची पाठ सोडत नाही आहेत. सध्या एका अभिनेत्याच्या धक्कादायक खुलाशामुळे मेगन मार्कल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मेगन मार्कलचा सहकलाकार सायमन रेक्स (Simon Rex and Meghan Markle) याने आश्चर्यकारक असा खुलासा केला आहे.

काय म्हणाला सायमन रेक्स?

सायमन रेक्स याने मेगनसह स्क्रीन शेअर केली आहे, त्याने असा दावा केला आहे क त्याला 70 हजार डॉलर अर्थात जवळपास 53 लाख रुपयाची एक ऑफर मिळाली होती. मेगन मार्कलसह शरीर संबंधाचा दावा करण्यासाठी त्याला ही जवळपास 53 लाखांची ऑफर मिळाली होती. सायमन रेक्सने एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे.

हे वाचा-आलिया नाही तर श्रद्धा कपूरसह रोमान्स करताना दिसणार रणबीर कपूर, डान्सचा VIDEO लीक

मेगन मार्कलने सायमन रेक्ससोबत 'कट्स'मध्ये (Cuts) काम केले आहे. 2005 मध्ये आलेल्या या शोच्या एकाच एपिसोडमध्ये दोघे एकत्र दिसले होते. यादरम्यान, मेगन मार्कल एक यशस्वी अभिनेत्री होती तर सायमन इंडस्ट्रीत आपला जम बसवण्यासाठी खटपट करत होता.

सायमनने अशी माहिती दिली की त्याला ही ऑफर तेव्हा देण्यात आली होती जेव्हा तो आर्थिक संकटातून जात होता. त्याने अशी माहिती दिली की मेगन मार्कलसह फिजिकल रिलेशन असल्याचा दावा करण्यासाठी त्याला मोठी रक्कम ऑफर करण्यात आली होती. तो म्हणतो की, 'त्यावेळी माझा खिसा पूर्णपणे रिकामा होता. मला पैशांची आवश्यकता होती. पण माझ्यासाठी असं करण्यापेक्षा फूड स्टँपवर जिंवत राहणं अधिक सोपं होतं. यामुळे मी पब्लिकेशनची ऑफर धुडकावून लावली. माझ्या आणि मेगनमधील संभाषण एका लंचच्या पलीकडे कधी गेलच नाही.'

सायमनने सांगितले की, जेव्हा त्याने पब्लिकेशनची ही ऑफर नाकारली तेव्हा मेगनने त्याला Thank You नोटही पाठवली होती. सायमन म्हणतो- 'तिने म्हटले होती की मला हे जाणून आनंद वाटला की जगात अजूनही चांगली माणसे आहेत.' सायमन म्हणतो की आजही त्याने मेगनची ही नोट फ्रेम करून घरात ठेवली आहे. सायमनने यासंदर्भात एक ट्वीटही केले आहे.

First published:

Tags: Hollywood