‘या’ हॉलिवूड स्टार कपलला घर विकणे आहे, किंमत ऐकून तुम्ही व्हाल हैराण

‘या’ हॉलिवूड स्टार कपलला घर विकणे आहे, किंमत ऐकून तुम्ही व्हाल हैराण

जेनिफर आणि ब्रॅडने २००० मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला होता. जेनिफरला सोडून ब्रॅड अँजेलिनासोबत राहायला गेला होता. आता ब्रॅड आणि अँजेलिनाही वेगळे झाले आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 08 जून- हॉलिवूडचे पावरफुल कपल अशी ओळख असलेले सुपरस्टार जेनिफर एनिस्टन आणि ब्रॅड पिटचं घर आता विकायला काढलं आहे. दोघांनी २००१ मध्ये बेवेरली हिल्स येथील एक बंगला विकत घेतला होता. या सुपरस्टार कपलने हा बंगला ९३ कोटी रुपयांना विकत घेतला होता पण आता या बंगल्याची किंमत जवळपास ३४३ कोटी रुपये झाली आहे.

१९३४ मध्ये हे घर तयार करण्यात आलं होतं. १२ हजार स्क्वेअर फूटमध्ये तयार करण्यात आलेल्या या घरात गेल्या ८५ वर्षांत अनेक बदल करण्यात आले आहेत. या घरात चार बेडरूम आणि १२ बाथरूम आहेत. याशिवाय डायनिंग रूम आणि २० जवळपास २० लोक राहू शकतील अशी व्यवस्था आहे. तसेच एक बार रूम आणि बॅकयार्डही आहे. हे कमी की काय एक खासगी एक्सरसाइज रूम आणि एक स्विमिंग पूलही आहे.

या अभिनेत्याच्या लग्नाच्याच दिवशी झालं होतं वडिलांचं निधन, आता होतेय घटस्फोटाची चर्चा

जेनिफर आणि ब्रॅडने २००० मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला होता. जेनिफरला सोडून ब्रॅड अँजेलिनासोबत राहायला गेला होता. आता ब्रॅड आणि अँजेलिनाही वेगळे झाले आहे. पण अजूनही ब्रॅड आणि जेनिफर चांगले मित्र आहेत. ब्रॅड जेनिफर एनिस्टनच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीलाही गेला होता. दोघांनी आधीच स्पष्ट केलं की दोघं दुसऱ्यांदा लग्न करणार नाही. जेनिफरने जस्टिन थियोरुक्स याच्यासोबत २०१५ मध्ये लग्न केलं होतं. मात्र २०१८ मध्ये दोघं वेगळे झाले. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रॅड आणि जेनिफर यांच्यातील वाढत्या संबंधांमुळे दोघांचं लग्न तुटलं असं म्हटलं जातं.

करण ओबेरॉय रेप केसमध्ये आता आली काळी जादू, प्रकरणाला नवं वळण

फ्रेंड्स या प्रसिद्ध टीव्ही सीरिजमधून जेनिफर एनिस्टनला तुफान प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिने अनेक हॉलिवूडपटात आणि मालिकांमध्ये काम केलं. तर लवकरच ब्रॅड पीट लिओनार्डो दी कॅप्रिओसोबत वन्स अपॉन ए टाइम इन हॉलिवूड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

VIDEO: थायलंडध्ये अनुपम खेर यांची स्कूटरवारी

First published: June 8, 2019, 12:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading