मुस्लीम असणं सध्या खूपच भीतीदायक, पाकिस्तानी हॉलिवूड अभिनेत्याचं वक्तव्य

मुस्लीम असणं सध्या खूपच भीतीदायक, पाकिस्तानी हॉलिवूड अभिनेत्याचं वक्तव्य

Rizwan Ahmed मूळ पाकिस्तानी असलेल्या हॉलिवूड अभिनेत्यानं मुस्लीम धर्माविषयी धक्कादायक वक्तव केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 2 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमनं नुकतंच धर्माचं कारण देत अभिनय क्षेत्रातून एक्झिट घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर आता मूळ पाकिस्तानी असलेल्या हॉलिवूड अभिनेत्यानं मुस्लीम धर्माविषयी धक्कादायक वक्तव केलं आहे. मूळचा पाकिस्तानी हॉलिवूड अभिनेता रिझवान अहमदनं आजच्या जगात मुस्लीम असणं खूपच भीतीदायक असल्याचं म्हटलं आहे.

रिझवानच्या या वक्तव्याचा खुलासा एका मासिकानं केला आहे. या मासिकानं रिझवानचं म्हणणं विस्तारानं सांगितलं आहे. या अभिनेत्याला एप्रिल 2018 ला दहशतवादी असल्याच्या आरोपांमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागला होता. ज्यामुळे त्याला शिकागोमधील स्टार वॉर सेलिब्रेशनमध्येही सहभागी होता आलं नाही. रिझवाननं त्याच्यासोबत घडलेल्या या भीतीदायक घटनेबाबत अशा काही आठवणी शेअर केल्या ज्या खरंच चिंताजनक आहेत.

झायरा वसीमच्या प्रकरणात तिसरं ट्वीस्ट, मॅनेजरने केलं ‘घूमजाव’

 

View this post on Instagram

 

Cheers @esquire for including me in your 'Mavericks of Hollywood' feature. Woulda been nice to be in your 'Mandem of Wembley' edition but I didn't make the cut.

A post shared by Riz Ahmed (@rizahmed) on

अमेरिकेतील एका प्रसिद्ध मासिकानं सांगितलं, अहमदनं या सर्व गोष्टी 25 जूनला एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितल्या. मागील वर्षी म्हणजेच 2018मध्ये रिझवान सोबत अमेरिकेतील एका एअरपोर्टवर चौकशी आणि कठोर तपासणी केली गेल्याची घटना खूपच चर्चेत होती. याच घटनेवर बोलताना रिझवान म्हणाला, ‘असं घडणं खरं तर काही दुर्मिळ घटना नाही. जेव्हाही मी विमान प्रवास करतो त्या-त्या प्रत्येक वेळी मला एअरपोर्टवर अशाप्रकारे अडवलं जातं आणि माझी तपासणी केली जाते.’

‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय विकी कौशल? राधिका आपटेने सांगितलं गुपित

रिझवाननं या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना काही प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावंही घेतली. तो म्हणाला, ‘मुस्लीम सेलिब्रेटींना प्रिसिद्धी आणि यश मिळालं मात्र यामुळे अमेरिकेतील इतर मुस्लीमांची परिस्थिती मात्र अजिबात सुधरली नाही.’ तो पुढे म्हणाला, ‘अमेरिकन कॉमेडियन हसन मिनहज पीबॉडी अवॉर्ड जिंकू शकतात, मी एमी अवॉर्ड जिंकू शकतो, इब्तिहाज महम्मद ऑलिम्पिक जिंकू शकते. पण यात काही समस्या आहेत आणि आम्ही एकटे याचा सामना करू शकत नाही.’

बिहारमध्ये बॉलिवूडचे हे दोन सुपरस्टार नवऱ्यांच अपहरण करून लग्न लावतात, पाहा VIDE

रिझवान म्हणाला, ‘आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. मी तुमची मदत मागण्यासाठी आलो आहे. कारण आजच्या जगात मुस्लीम असणं खरंच खूप भीतीदायक आहे.’ रिझवाननं आतापर्यंत ‘Rogue One: A Star Wars Story’, ‘The Reluctant Fundamentalist’, ‘Britz’, ‘Black Gold’ आणि ‘Hamlet’ अशा सुपर हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. रिज नावानं प्रसिद्ध असलेला रिझवान अहमद ब्रिटनचा नागरिक असला तरीही तो मूळचा पाकिस्तान हॉलिवूड अभिनेता आहे.

===================================================================

VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 11:32 AM IST

ताज्या बातम्या