जेव्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची आॅस्कर ट्राॅफी चोरीला जाते...

जेव्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची आॅस्कर ट्राॅफी चोरीला जाते...

हा पुरस्कार सोहळा संपल्यानंतर एका अज्ञाताने तिची ऑस्कर ट्रॉफी चोरली. ट्रॉफी चोरल्यानंतर त्या इसमाने ट्रॉफीचा फोटो फेसबुकवर शेअर केला

  • Share this:

07 मार्च : सिनेसृष्टीतला सर्वोच्च मानाचा मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार मिळणे हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. पण पुरस्कार मिळाल्यानंतर काही काळातच हा पुरस्कार चोरीला गेला तर?

90 वा ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. फ्रान्सेस मॅकडोरमेंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर देण्यात आला. तिच्यासाठी तो अत्यंत आनंदाचा क्षण होता. पण तिचा हा आनंद अगदी काही क्षणातच मावळला, कारण हा पुरस्कार सोहळा संपल्यानंतर एका अज्ञाताने तिची ऑस्कर ट्रॉफी चोरली. ट्रॉफी चोरल्यानंतर त्या इसमाने ट्रॉफीचा फोटो फेसबुकवर शेअर केला आणि सर्वोत्कृष्ट संगीतासाठी त्याला हा पुरस्कार मिळाल्याची पोस्ट ही टाकली होती. याच पोस्टच्या आधारे पोलिसांनी त्या इसमाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं. त्या अज्ञात इसमाविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून, फ्रान्सेस मॅकडोरमेंडला तिची ट्रॉफी परत करण्यात आली.

फ्रान्सेसला मिळालेला हा दुसरा ऑस्कर आहे. या आधी तिला 1997 साली 'फारगो' या सिनेमासाठी ऑस्कर मिळाला होता.

First published: March 7, 2018, 1:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading