ब्रेकअप,पॅचअप आणि आता साखरपुडा... काय चाललंय जस्टिन बिबरचं?

कॅनडाचा पाॅप सिंगर जस्टिन बिबरनं माॅडेल हेली बाल्डविनशी साखरपुडा केलाय. २४ वर्षांचा जस्टिन २०१६मध्ये हेलीला डेट करत होता.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2018 03:42 PM IST

ब्रेकअप,पॅचअप आणि आता साखरपुडा... काय चाललंय जस्टिन बिबरचं?

कॅनडा, ०९ जुलै : या बातमीनं अनेक तरुणींच्या हृदयाची शकलं होतील. विशेषत: जस्टिन बिबरच्या फॅन्सची. कॅनडाचा पाॅप सिंगर जस्टिन बिबरनं माॅडेल हेली बाल्डविनशी साखरपुडा केलाय. २४ वर्षांचा जस्टिन २०१६मध्ये हेलीला डेट करत होता. काही दिवसांनी त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या पॅचअपच्या बातम्या यायला लागल्या होत्या. दोघं एकत्र दिसायला लागले होते. ७जुलैला त्यांनी साखरपुडा केला.

दोघंही बहामास इथे ट्रिपला गेले असताना दोघांनी साखरपुडा केला. पण त्यांच्या मॅनेजर्सनी काही सांगायला नकार दिलाय.

हेही वाचा

'तारक मेहता...'च्या कलाकारांना मोठा धक्का, दिवसाचे शुटिंग केले रद्द

Loading...

अशा पद्धतीने डॉ. हाथी फेम कवी कुमार यांनी वजन केले होते कमी

पावसामुळे मोटरमनची 'अशी' होतेय पंचायत !

खरं तर दोघांच्या पालकांनी केलेल्या ट्विटमुळे ही बातमी बाहेर फुटली. आता तरी जस्टिन बिबर लवकरच लग्नाची गोड बातमी देईल, असं वाटतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 9, 2018 03:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...