हाॅलिवूड अभिनेत्रीने रोखली खेळण्यातली बंदूक,पोलिसांनी झाडली खरोखरची गोळी !

News18 Lokmat | Updated On: Sep 1, 2018 05:50 PM IST

हाॅलिवूड अभिनेत्रीने रोखली खेळण्यातली बंदूक,पोलिसांनी झाडली खरोखरची गोळी !

अमेरिका, 01 सप्टेंबर : मेडिकल ड्रामा सिरीज 'ईआर' मुळे चर्चेत आलेली हाॅलिवूड अभिनेत्री वेनेसा मार्केजची पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालाय. वेनेसा मार्केजने लाॅस अॅजेलिसच्या घरी पोहोचली होती तेव्हा अचानक वेनेसाने हुबेहुब खरी दिसणारी खेळण्यातली बंदूक पोलिसांवर रोखली होती. त्यामुळे ही बंदूक खरी समजून गोळीबार केला यात तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना वेनेसाच्या घर मालकासोबत फोनवर चौकशी करण्यासाठी पोहोचली होती. त्यावेळी पोलिसांसोबत एक डाॅक्टरही हजर होता. पण मार्केजने धमकी देण्यासाठी खेळण्याची टाॅय गन पोलिसांवर रोखली. त्यामुळे प्रकरण चांगलेच चिघळले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत गोळीबार केला.

लाॅस अॅजेलिस पोलीस अधिकारी लेफ्टिनेट मेंडोजा यांनी सांगितलं की, मार्केजही मानसिक आजाराने ग्रस्त होती. पोलिसांसोबत आलेल्या डाॅक्टरांनी वनेसासोबत दीड तास बातचीत केली होती, पण तरीही काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हती. अचानक तिची मानसिक स्थिती बिघडली आणि तिने पोलिसांकडे इशारा करत टाॅय गन रोखली होती.

VIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2018 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...