6 मुलांची आई असलेल्या एंजेलिनाला ब्रॅड पिटनं दिली धमकी, घटस्फोट दे नाहीतर...

6 मुलांची आई असलेल्या एंजेलिनाला ब्रॅड पिटनं दिली धमकी, घटस्फोट दे नाहीतर...

एंजेलिनानं आतापर्यंत 3 लग्न केली असून तिची ही तीनही लग्नं अयशस्वी ठरली आहेत.

  • Share this:

मुंबई, 09 जून : हॉलिवूडमधील एकेकाळचं हॉट कपल ब्रॅड पिट एंजेलिना जोली आता एकत्र नाहीत 2016मध्ये एंजेलिना आणि ब्रॅड वेगळे झाले मात्र त्यांचा घटस्फोट मात्र अद्याप झालेला नाही. त्यामुळेच सध्या या दोघांमध्ये खूप वाद होत असून हे वाद आता एवढे विकोपाला गेले आहेत की, ब्रॅडनं 6 मुलांची आई असलेल्या एंजेलिनाला धमकी दिली आहे. 2016मध्येच ब्रॅड आणि एंजेलिना यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला असला तरी अद्याप त्यांचा घटस्फोट होऊ शकलेला नाही. कारण एंजेलिनानं अजूनही घटस्फोटाच्या पेपर्सवर सही केलेली नाही. त्यामुळे आता ब्रॅड खूप रागात आहे.

 

View this post on Instagram

 

#angelinajolie #angelina #jolie #bradpitt #brad #pitt #brangelina #joliepitt #angelinajoliepitt #bradangelina

A post shared by AngelinaJolie_ fanpage_ita (@angelinajolie_fanpageita) on

सूत्रांच्या माहितीनुसार, आता ब्रॅडनं एंजेलिनाला अल्टीमेट दिला आहे. पिटनं सांगितलं की, तो आता कायदेशीर मार्गानं जाणार आहे. ब्रॅड आणि त्याच्या टीमचं म्हणणं आहे की एंजेलिना घटस्फोटाच्या पेपर्सवर साइन करण्यासाठी खूप टाळाटाळ करत आहे. त्यामुळे तिनं यासाठी एक वेळ सांगावी आणि पेपर्सवर सही करण्यासाठी तयार राहावं असं त्यांनी म्हटलं आहे आणि जर तिनं असं केलं नाही तर तिला यासाठी दंड भरावा लागेल हेही त्यांनी स्पष्ट केलं.

सेक्रेटरीच्या पार्थिवाला अमिताभ- अभिषेकने दिला खांदा, ऐश्वर्याही झाली भावुक

ब्रॅड पिटच्या मित्रांचं म्हणणं आहे की, ब्रॅड एक शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. तो अनेकदा घटस्फोटाची ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न केले आहेत. पण प्रत्येक महिन्यात एंजेलिना काही ना काही कारण काढून ही प्रक्रिया लांबवत आहे. त्यामुळे आता एंजेलिनानं घस्फोटाचे पेपर्स साइन केले नाही तर तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि तिला त्याचा दंडही भरावा लागेल. एंजेलिनानं आतापर्यंत 3 लग्नं केली असून तिची ही तीनही लग्न अयशस्वी ठरली आहेत. एंजेलिना तिच्या 6 मुलांची सांभाळ एकटी करत आहे.

सुश्मिता सेनच्या भावाने कोर्टात जाऊन केलं लग्न, इथे पाहा PHOTO

 

View this post on Instagram

 

❤️❤️❤️

A post shared by Angelina Jolie (@angelinajolieofficial) on

कार्तिक आर्यनशी लिंकअपच्या चर्चांमुळे साराच्या कुटुंबातली 'ही' व्यक्ती आहे नाराज

First published: June 9, 2019, 6:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading