ईशा अंबानीच्या संगीत कार्यक्रमात Beyonce च्या परफॉरमन्ससमोर फिके पडले बॉलिवूड स्टार

उदयपूरमध्ये रंगलेल्या संगीत कार्यक्रमात बियॉन्सेच्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. वेस्टर्न कपड्यांबरोबर अस्सल भारतीय दागिन्याचा उत्तम ताळमेळ तिच्या लुकमधून दिसत होता.

  • Share this:

उद्योजक मुकेश अंबानींच्या कन्या ईशा अंबानीचा विवाह सोहळा राजस्थानातील उदयपूरमध्ये सुरू आहे. मेंदी आणि हळदीच्या कार्यक्रमाच्या आधी एक शानदार संगीत कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत सर्व कलाकार हजर होते. कार्यक्रमाला अमेरिकेची पॉप स्टार बियोन्सेच्या परफॉरसन्सने चार चांद लावले होते.

 बियॉन्से खास ईशा अंबानीच्या संगीत कार्यक्रमासाठी भारतात आली होती. रविवारी सकाळी ती उदयपूरमध्ये दाखल झाली. रात्री झालेल्या संगीत कार्यक्रमात बियॉन्सेच्या परफॉरमन्सनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.

या परफॉरमन्सनंतर बियॉन्सेनं तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय तिने कार्यक्रमात झालेल्या परफॉरमन्सची छोटीशी झलक एका क्लिपद्वारे शेअर केली आहे.

उदयपुरात रंगलेल्या कार्यक्रमात बियॉन्सेचा शानदार लुक पाहून सगळे थक्क झाले होते. कारण तिच्या वेस्टर्न लुकमध्ये एक देसी झलकदेखील पाहायला मिळाली. बियोन्सेच्या लुकचं वैशिष्ट्यं म्हणजे तिने डोक्यावर अस्सल भारतीय मांगटिका घातला होता.

बियॉन्सेने वेस्टर्न कपड्यांसोबतच दागिन्यांचं उत्तम ताळमेळ साधला होता. ज्यात ती फार सुंदर दिसत होती. बियॉन्सोच्या 'हाय स्लिट' ड्रेसमुळे अनेक डिझायनर्सना प्रेरणा मिळू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2018 01:19 PM IST

ताज्या बातम्या