कोरोनामुळे ग्रॅमी विजेत्या गायकाची आयुष्याशी सुरु असलेली लढाई संपली, 73व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोरोनामुळे ग्रॅमी विजेत्या गायकाची आयुष्याशी सुरु असलेली लढाई संपली, 73व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध अमेरिकन गायक आणि ग्रॅमी विजेते जॉन प्राइन (John Prine) यांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 08 एप्रिल : प्रसिद्ध अमेरिकन गायक आणि ग्रॅमी विजेते जॉन  प्राइन  (John Prine) यांचा कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. ते 73 वर्षांचे होते. अशी माहिती मिळते आहे की, त्यांना न्यूमोनिया झाला होता. गेल्या काही दिवसांपासून जॉन खूप आजारी होती. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर लगेचच त्यांना दवाखान्यात भरती करण्यात होतं. ते एकूण 13 दिवस आयसीयूमध्ये होते.

(हे वाचा-COVID-19 : इटली भारताचा भविष्यकाळ? मुक्त बर्वेने शेअर केला थरकाप उडवणारा VIDEO)

जॉन प्राइन यांच्यावर वँडरबिल्ट युनिव्हरसिटी मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू होते. जॉन यांच्या कुटुंबीयांनी सुद्धा या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्याचप्रमाणे अनेक अमेरिकन मीडिया संस्थांनी ही बातमी प्रसारिक केली आहे. प्राइन यांची पत्नी फियोना यांनी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती 20 मार्चला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली होती. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या परिवाराकडून माहिती मिळाली आहे की, प्राइन कोव्हिड-19 (COVID-19) ने संक्रमित झाल्यानंतर त्यांच्या केसमध्ये खूप समस्या होत्या. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला.

10 ऑक्टोबर 1946 रोजी जॉन यांचा जन्म शिकागोमध्ये झाला होता आणि 14 वर्षांचे असल्यापासून त्यांनी गिटारचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यांनी शिक्षण देखील संगीतातूनच पूर्ण केले होते. ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच्या काळात त्यांनी गाणी लिहिण्यास सुरूवात केली. 1991 मध्ये त्यांनी बेस्ट कंटेंपररी फोक अल्बमसाठी ग्रॅमी अवॉर्ड मिळाला होता. याच कॅटेगरीमध्ये 2005 मध्ये सुद्धा त्यांना दुसरा ग्रॅमी अवार्ड मिळाला होता. 2019मध्ये त्यांना द रेकॉर्डिंग अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला होता. ते गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरमुळे त्रस्त होते. त्यांच्या मानेची आणि फुप्फुसांची शस्त्रक्रिया देखील झाली होती.

संपादन-जान्हवी भाटकर

First published: April 8, 2020, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading