News18 Lokmat

माॅलीवूडमध्ये लवकरच 'या' पाॅर्नस्टारची एंट्री !

मिया खलिफा ही मल्याळम सिनेमातून पर्दापण करतेय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2017 11:42 PM IST

माॅलीवूडमध्ये लवकरच 'या' पाॅर्नस्टारची एंट्री !

31 आॅक्टोबर : सनी लिआॅननंतर आता आणखी एक पाॅर्नस्टार बाॅलिवूडच्या उंबरठ्यावर येऊन थांबली आहे. या पाॅर्नस्टारचं नाव आहे मिया खलिफा...तुर्तास मिया खलिफा ही मल्याळम सिनेमातून पर्दापण करतेय.

पाॅर्न इंडस्ट्रीत अल्पावधीत लोकप्रिय झालेली मिया खलिफा टाॅप 10 पाॅर्न स्टारमध्ये पोहोचली. मात्र, अलीकडेच तिने पाॅर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकलाय. मिया खलिफा सद्धा स्पोर्ट्स जर्नलिस्ट म्हणून काम करतेय. मिळाल्या माहितीनुसार, मिया खलिफा मल्याळम सिनेमा 'चंक्स 2: द कन्क्ललूजन' मध्ये भूमिका साकारण्यासाठी आॅफर मिळालीये. या सिनेमातून मिया आता भारतीय सिनेसृष्टीत पर्दापण करत आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत 'चंक्स 2: द कन्क्ललूजन' या सिनेमाचे दिग्दर्शक ओमर लूलू यांनी स्पष्ट केलंय की, 'मिया खलिफाला एक आयटम साँग आणि एक मुख्य भूमिका देण्यात आलीये.'

दोन वर्षांपूर्वी अशी अफवा पसरली होती की मिया खलिफा 'बिग बाॅस 9' च्या घरात येणार आहे. पण त्यावेळी मिया खलिफाने हे वृत्त फेटाळून लावले होते आणि भारतात येणार नसल्याचं सांगितलं होतं.

पण आता मात्र मिया खलिफाला मोठ्या पडद्याची हाव काही सोडवत नाहीये. तिने या सिनेमात काम करण्यासाठी होकार कळवलाय. तिचा हा मल्याळम सिनेमा 2018 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.

Loading...

This outfit came with an affair with my tennis instructor

A post shared by Mia Khalifa (@miakhalifa) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 10:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...