अरे बापरे! 'In The Morning' गाण्यासाठी Nude झाली Jennifer Lopez; Video होतोय व्हायरल

अरे बापरे! 'In The Morning' गाण्यासाठी Nude झाली Jennifer Lopez; Video होतोय व्हायरल

जेनिफर लोपेजच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 17 जानेवारी: हॉलिवूड (Hollywood) गायक, अभिनेत्री आणि डान्सर जेनिफर लोपेज (Jennifer Lopez) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तर तिचा जलवा कायम आहेच. 51 वर्षीय जेनिफरच्या सौंदर्यावर चाहते अजूनही फिदा आहेत. शिवाय जेनिफर 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन (Joe biden) यांच्या शपथविधी  सोहळ्याला (Swearing ceremony) उपस्थित राहणार आहे. पण सोशल मीडियावर ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जेनिफर लोपेजचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर (Instagram) प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती न्यूड (Nude) दिसत आहे. हा व्हिडिओ तिच्या 'इन द मॉर्निंग' (In the morning) या नवीन गाण्याचा (new song) आहे. जो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. जेनिफर या व्हिडिओत कपड्यांशिवाय दिसत आहे. तसेच तिच्या शरीरावर परीसारखे पंख लावले आहेत.

हे ही वाचा-हिंदीतून एक शिवी दिली, तर पूर्ण खानदान...', खुशी कपूरचा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ शेअर करताना जेनिफरनं लिहिलं की - 'मी तुझ्यावर माझ्यापेक्षा अधिक प्रेम केलं आहे. हा व्हिडिओ म्हणजे एकतर्फी प्रेमावर भाष्य करणारा असून सांकेतिकांनी परिपूर्ण आहे. आपण कोणालाही बदलू शकत नाही .आपण फक्त स्वत: ला बदलू शकता. त्यामुळं आपण आपल्या स्वतः च्या पंखाना जन्म दिला पाहिजे आणि आपली जिथे काहीच किंमत नाही, तेथून दूर जायला हवं'

View this post on Instagram

A post shared by Jennifer Lopez (@jlo)

जेनिफर लोपेजचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या व्हिडिओवर लाईक आणि कमेंट करण्यासाठी गर्दी केली आहे. व्हिडिओमध्ये जेनिफर लोपेजची बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वयाच्या 51 व्या वर्षीही या अभिनेत्रीने आपलं शरीर खूप फिट ठेवलं आहे.

जेनिफर लोपेज गायकाबरोबरच ती एक यशस्वी अभिनेत्रीही आहे. यापूर्वी जेनिफर 'हसलर्स' चित्रपटात शेवटची दिसली होती. हा चित्रपट एका क्राइम ड्रामावर आधारित होता. या चित्रपटात जेनिफरशिवाय लिली रीनहर्ट, ज्युलिया स्टिल्स, केके पामर, कार्डी बी आदी कलाकार मुख्य भुमिकेत दिसले होते.

Published by: News18 Desk
First published: January 17, 2021, 4:18 PM IST
Tags: hollywood

ताज्या बातम्या