• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अभिनेत्रीने केलं बॉडीगार्डशीच लग्न; चौथ्यांदा बांधली लग्नगाठ

अभिनेत्रीने केलं बॉडीगार्डशीच लग्न; चौथ्यांदा बांधली लग्नगाठ

कॅनडामध्ये राहणारा अँडरसनचा बॉडीगार्ड Dan Hayhurst लॉकडाउन काळात सतत अँडरसनसोबत होता. कोरोना काळात असलेल्या लॉकडाउनमध्येच अँडरसनला आणि तिचा बॉडीगार्ड Dan Hayhurst एकमेकांच्या प्रेमात पडले

 • Share this:
  वॉशिंग्टन, 28 जानेवारी : प्रसिद्ध अमेरिकरन कॅनडियन मॉडेल, अभिनेत्री, टीव्ही पर्सनॅलिटी पॅमेला अँडरसनने आपल्या बॉडीगार्डसोबतच लग्नगाठ बांधली आहे. पॅमेलाने Dan Hayhurst शी लग्न केलं आहे. 25 वर्षांपूर्वी माझ्या आजोबांकडून मिळालेल्या, माझ्या मालमत्तेवर Vancouver Island येथे माझा विवाह झाल्याचं पॅमेलाने सांगितलं आहे. Vancouver Island येथे माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं होतं ते अजूनही एकत्र आहेत. मीदेखील त्याच ठिकाण विवाहबद्ध झाल्याने हे वर्तुळ पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया पॅमेलाने दिली आहे. ख्रिसमसला या दोघांचा विवाह पार पडला. कॅनडामध्ये राहणारा अँडरसनचा बॉडीगार्ड Dan Hayhurst लॉकडाउन काळात सतत अँडरसनसोबत होता. कोरोना काळात असलेल्या लॉकडाउनमध्येच अँडरसनला आणि तिचा बॉडीगार्ड Dan Hayhurst एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ख्रिसमसला दोघांनी खासगीरित्या विवाह केला.

  (वाचा - Birthday special : नेपोटिझम नव्हे स्टार किड्सनाही असतो स्ट्रगल; बॉबी देओल)

  Dan Hayhurst सोबत लग्न झाल्यानंतर तिने एका मुलाखतीत आधीच्या लग्नांचाही उल्लेख केला. माझं तीन वेळा लग्न झालं आहे. परंतु लोकांना माझं पाच वेळा लग्न झालं असं वाटतं. तिने 1995 मध्ये Tommy Lee शी लग्न केलं. परंतु 1998 मध्येच दोघांचे मार्ग वेगळे झाले. पॅमेला आणि Tommy Lee यांना दोन मुलं आहेत. त्यानंतर 2006 मध्ये तिने Kid Rock शी लग्न केलं आणि त्याच वर्षात 2006 मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर पुन्हा Rick Solomon शी तिने 2007 मध्ये आणि पुन्हा 2013 मध्ये दोनदा लग्न केलं, परंतु त्याचं नातं टिकू शकलं नाही.

  (वाचा - HOLLYWOOD: 'मी उठल्यावर त्याच्या पलंगावर होते'..हॉलिवूड अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप)

  त्यानंतर कोरोना काळातील लॉकडाउनमध्ये झालेल्या प्रेमानंतर तिने चौथ्यांदा बॉडीगार्ड Dan Hayhurst शी लग्न खासगीत लग्न करून सर्वानांच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
  Published by:Karishma
  First published: