तलावावर फिरण्यासाठी गेलेली अभिनेत्री बेपत्ता, बोटीमध्ये एकटाच सापडला 4 वर्षांचा मुलगा; तपास सुरू

तलावावर फिरण्यासाठी गेलेली अभिनेत्री बेपत्ता, बोटीमध्ये एकटाच सापडला 4 वर्षांचा मुलगा; तपास सुरू

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तलावामध्ये कुठेतरी बेपत्ता झाल्याचे वृत्त काही मीडिया अहवालांनी दिले आहे. काहींनी अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची शंका वर्तवली आहे.

  • Share this:

मुंबई, 09 जुलै : एका प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर एक विचित्र घटना घडल्याचे समोर येत आहे.  ही अभिनेत्री तिच्या 4 वर्षांच्या मुलाबरोबर तलालावर फिरण्यासाठी गेली होती. त्याकरता तिने भाड्याने एक बोट देखील घेतली होती. मात्र आता असे वृत्त समोर येत आहे की ही अभिनेत्री तलावामध्ये कुठेतरी बेपत्ता  झाली आहे. काही मीडिया अहवालांनी तर अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याची शंका वर्तवली आहे. या प्रकरणामुळे सर्वजण हैराण आहेत. ही घटना हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नाया रिव्हेरा (Naya Rivera) बरोबर घडली आहे. अशी माहिती मिळते आहे की, या अभिनेत्रीचा तपास सध्या सुरू आहे. त्याचप्रमाणे तिचा 4 वर्षांचा मुलगाही पोलिसांंना भेदरलेल्या अवस्थेमध्ये सापडला होता.

अभिनेत्री नाया अशाप्रकारे विचित्र पद्धतीने बेपत्ता झाल्याने हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही मीडिया अहवालांनी ती तलावामध्ये बुडाल्याचा संशय व्यक्त केला आहे. एका इंटरनॅशनल पोर्टलच्या मते अभिनेत्रीचा तलावामध्ये आणि आजुबाजुच्या परिसरात तपास सुरू आहे.

(हे वाचा-बॉलिवूडसाठी दु:खद ठरत आहे साल 2020, या सेलिब्रिटींनी घेतला जगाचा निरोप)

नायाने बेपत्ता होण्याआधी काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिच्या मुलाबरोबरचा हा फोटो देखील पोस्ट केला होता. तिच्या या पोस्टवर देखील चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. चाहते तिची खुशाली जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

View this post on Instagram

 

just the two of us

A post shared by Naya Rivera (@nayarivera) on

अशी माहिती मिळते आहे की , नायाने बुधवारी दुपारी 3 तासाकरता एक बोट तलाव फिरण्यासाठी भाड्याने घेतली होती. तीन तासानंतरही ठरलेल्या वेळेत त्यांची नाव न परतल्याने त्याठिकाणी असणारे कर्मचारी नावेपर्यंत पोहोचले. त्याठिकाणी पीरु लेकमधील बोटीमध्ये त्यांना नायाचा मुला Josey मिळाला पण नायाचा काही पत्ता लागला नाही. अशी माहिती समोर येत आहे की अभिनेत्री मुलाबरोबर त्याठिकाणी स्विमिंग करत होती, पण केवळ तिचा मुलगाच बोटीमध्ये परतला.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 9, 2020, 10:13 PM IST
Tags: hollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading