Home /News /entertainment /

हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री Betty White यांचं निधन; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांनी व्यक्त केलं दुःख

हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री Betty White यांचं निधन; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांनी व्यक्त केलं दुःख

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हॉलिवूडमध्ये (Hollywood) एक दुःखद घटना घडली आहे. हॉलिवूडच्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री बेट्टी व्हाईट (Betty White) यांचं निधन झालं आहे.

    मुंबई,1 जानेवारी -    नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हॉलिवूडमध्ये   (Hollywood)  एक दुःखद घटना घडली आहे. हॉलिवूडच्या प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री बेट्टी व्हाईट (Betty White) यांचं निधन झालं आहे. त्या 99 वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक वर्षे मनोरंजनसृष्टीत काम करत लोकांचं मनोरंजन केलं आहे. त्या फारच प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. दीर्घकाळ टीव्हीवर काम करणाऱ्या अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी टीव्हीवरील 'द गोल्डन गर्ल्स '   (The Golden Girls)  या कार्यक्रमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. बेटी व्हाईट याअमेरिकन अभिनेत्री तर होत्याच. शिवाय त्या एक कॉमेडियनसुद्धा होत्या. त्यांना 'फर्स्ट लेडी ऑफ टेलिव्हिजन' म्हणूनसुद्धा ओळखलं जात. त्या एमी पुरस्कार विजेत्या आहेत. त्या पहिल्यांदा 1949 मध्ये पडद्यावर झळकल्या होत्या. तेव्हापासून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांचा अफाट चाहतावर्ग आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.जो बायडन  (Joe Biden)  यांनी ट्विट करत लिहिलं आहे, 'त्या फारच गोड महिला होत्या. मला आणि जिलला (अमेरिकेच्या प्रथम महिला) त्यांनी फार आठवण येणार'. पुढं त्यांनी म्हटलं आहे. बेट्टी व्हाईट यांनी त्यांच्या बालपणापासून लोकांचं मनोरंजन करण्याचं काम केलं आहे. तसेच बेट्टी व्हाईट यांच्या प्रवक्त्याने पीपल मॅगझीनला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे, 'आता काही दिवसांतच त्या १०० वर्षांच्या होणार होत्या. मला वाटत होतं त्या नेहमी आपल्यामध्येच राहणार. मला त्यांची फार आठवण येणार. मलाच नव्हे तर या पाळीव प्राण्यांवरसुद्धा त्यांनी जीवापाड प्रेम केलं आहे. त्यांनासुद्धा बेट्टी यांची प्रचंड आठवण येणार. त्यांना कधी वाटत नव्हतं कि त्यांचा मृत्यू होईल. त्या मृत्यूला कधीच घाबरत नव्हत्या. त्या नेहमीच आपले दिवंगत पती एलन लुडेन यांना भेटण्याची इच्छा व्यक्त करत. काल रात्री त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Hollywood

    पुढील बातम्या