मुंबई, 26 एप्रिल- मराठमोळी संगीतकार(Composer) जोडी अजय-अतुल (Ajay-Atul) यांच्या गाण्यावर थिरकण्याचा मोह कोणालाचं नाही आवरत. त्यांचं संगीत इतकं धमकेदार असतं की प्रत्येकजण भान विसरून त्यावर नाचू लागतो. असचं काहीसं झालं हॉलीवूड अभिनेत्री आणि डान्सर(Hollywood Actor and Dancer ) लॉरेन गॉटलीब (Lauren Gottlieb) सोबतसुद्धा. लॉरेनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. त्यामध्ये ती ‘अग्निपथ’ (Agneepath) मधील ‘चिकनी चमेली’ (Chikani Chameli) या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर(Viral Video) खुपचं पसंत केला जातं आहे.
सन 2012 मध्ये आलेल्या ‘अग्निपथ’ या चित्रपटामध्ये चिकनी चमेली हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. यामध्ये अभिनेत्री कटरीना कैफने उत्तम डान्स केला होता. तर याचं संगीत आजही फेमस आहे. हे संगीत मराठी जोडी अजय अतुल यांनी दिलं होतं.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या या व्हिडीओमध्ये लॉरेन याच गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसून येतं आहे. लॉरेन हे गाणं खुपचं एन्जॉयदेखील करत आहे. यामध्ये तिच्यासोबत तिचा मित्रसुद्धा दिसून येत आहे. लॉरेनने नेहमीच आपल्या डान्सने चाहत्यांना वेड लावलं आहे. हा व्हिडीओ पाहूनसुद्धा चाहते खुपचं खुश झाले आहेत. आणि मजेशीर कमेंट्स सुद्धा करत आहेत.
(हे वाचा: स्वप्निल जोशीनं घेतला मोठा निर्णय; केवळ याच गोष्टीसाठी करणार सोशल मीडियाचा वापर )
लॉरेन ही एक अमेरिकी डान्सर आणि अभिनेत्री आहे. लॉरेनने रेमो डिसूझा यांच्या ‘एबीसीडी’ या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं होतं. लॉरेनला लहानपणापासूनचं डान्सची मोठी आवड आहे. तिनं वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून डान्सचे धडे घेतले आहेत. तिने आपल्या करीयरची सुरुवात एका अमेरिकी रीएलिटी शो ‘सो यू थिंक, यू कॅन डान्स’ मधून केली होती. त्याचबरोबर लॉरेनने भारतीय शो ‘नच बलिये 6’ मध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. त्यामध्ये ती खूप सारी मतं मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Instagram, Marathi entertainment, Video viral