मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आधी आईची हत्या केली, मग पंतप्रधानांच्या हत्येचा रचलेला कट; 24 वर्षीय अभिनेत्याला जन्मठेप

आधी आईची हत्या केली, मग पंतप्रधानांच्या हत्येचा रचलेला कट; 24 वर्षीय अभिनेत्याला जन्मठेप

नेटफ्लिक्सचा प्रसिद्ध शो 'रिव्हरडेल'मध्ये दिसलेला हॉलिवूड अभिनेता रायन ग्रॅंथविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नेटफ्लिक्सचा प्रसिद्ध शो 'रिव्हरडेल'मध्ये दिसलेला हॉलिवूड अभिनेता रायन ग्रॅंथविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नेटफ्लिक्सचा प्रसिद्ध शो 'रिव्हरडेल'मध्ये दिसलेला हॉलिवूड अभिनेता रायन ग्रॅंथविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 23 सप्टेंबर : नेटफ्लिक्सचा प्रसिद्ध शो 'रिव्हरडेल'मध्ये दिसलेला हॉलिवूड अभिनेता रायन ग्रॅंथमविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 24 वर्षीय रायन ग्रॅंथमला आईच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या बातमीने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. रायन ग्रॅंथमवर आईची हत्या करण्याचा आरोप होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने न्यायालयासमोर त्याचा गुन्हा कबूल केला. अशातच याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सीबीसीच्या अहवालानुसार, न्यायमूर्ती कॅथलीन केर यांनी न्यायालयाचा निर्णय देताना ही घटना दुःखद, हृदयद्रावक असल्याचं सांगितलं. आता त्याला जन्मठेपेची  शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार रायन आयुष्यात कधीही बंदूक वापरू शकत नाही. तसेच 14 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्याची पॅरोलवर सुटका होणार आहे. कॅनडातील व्हँकुव्हर येथील ब्रिटिश कोलंबियाच्या सर्वोच्च न्यायालयाने रायन ग्रँथमला ही शिक्षा सुनावली आहे. हेही वाचा -  दीपिकाला पाहून ऑऊट ऑफ कंट्रोल झाली उर्वशी; फ्लाइटमध्ये केलं असं काही...PHOTO VIRAL रायनने मार्च 2022 मध्ये 64 वर्षीय आईची गोळ्या घालून हत्या केली. त्याची आई बार्बरा वेट पियानो वाजवत असताना रायनने तिच्यावर गोळी झाडली आणि तिचा मृत्यू झाला. आईची हत्या केल्यानंतर रायनने बिअर आणि गांजा विकत घेतला होता. त्यानंतर त्याने मोलोटोव्ह कॉकटेल बनवण्याचा प्रयत्न केला आणि नेटफ्लिक्स पाहिला. त्यानंतर आईचे शरिर झाकून झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी रायनने आईच्या मृत शरिराभोवती मेणबतत्त्या पेटवल्या आणि दुसरा खून करण्यासाठी बाहेर पडला. रायन ग्रँथमने तीन लोडेड बंदुका, मोलोटोव्ह कॉकटेल, दारूगोळा, कॅम्पिंग गियर आणि ओटावा येथील रिडो कॉटेजचा नकाशा आपल्या कारमध्ये ठेवला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना मारण्याची त्याची योजना होती. तो त्यांच्या घरीही गेला होता मात्र त्याने विचार केला की पंतप्रधानांवर सामुहिक ठिकाणी शूटिंग करेल. रायनने असं काहीच न करता व्हँकुव्हर पोलिसांकडे जाऊन स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. रायनने पोलिस अधिकाऱ्याला सांगितले की, 'मी माझ्या आईला मारलं आहे'. सध्या सोशल मीडियावर त्याच्या शिक्षेची बातमी प्रचंड व्हायरल होत आहे.
First published:

Tags: Hollywood, Social media

पुढील बातम्या