Home /News /entertainment /

चित्रपटातील स्टंट नव्हे तर खरीखुरी घटना; प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याच्या अपघाताचं भीषण दृश्य

चित्रपटातील स्टंट नव्हे तर खरीखुरी घटना; प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याच्या अपघाताचं भीषण दृश्य

हॉलिवूड (Hollywood Actor) अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगरच्या (Arnold Schwarzenegger) कारला जबरदस्त अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

    मुंबई, 22 जानेवारी- हॉलिवूड   (Hollywood Actor)  अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगरच्या   (Arnold Schwarzenegger)   कारला जबरदस्त अपघात झाल्याचं समोर आलं आहे. सुदैवाने अभिनेता सुखरूप आहे. परंतु हा अपघात इतका भयानक होता, की चार कार एकमेकांवर आदळल्या. बघणाऱ्यांना हा अपघात एखाद्या चित्रपटातील स्टंट सारखा भासल्याचं सांगितलं आहे. फॉक्स न्यूज डिजिटलच्या रिपोर्टनुसार, लॉस ऍंजिल्सचे पोलीस अधिकारी ड्रेक मॅडिसन यांनी सांगितलं की, सनसेट आणि अॅलनफोर्ड येथे चार वाहनांचा अपघात झाला होता. यामध्ये एका महिलेला दुखापत झाल्याने तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान या अपघातामध्ये हॉलिवूड अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगरचासुद्धा समावेश होता. ७४ वर्षीय अभिनेता आपल्या काळया रंगाच्या युकॉन कारने निघाला होता. तेव्हा त्यांची कार समोर असलेल्या लाल रंगाच्या प्रियासला धडकली. त्यांनतर अभिनेत्याची कार प्रियास आणि पोर्स कियेनच्या मध्ये अक्षरशः सॅन्डविच झाली होती. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी या अपघातचं वर्णन करताना सांगितलं आहे की, हा अपघात पाहताना आम्हाला एखाद्या चित्रपटातील भयानक स्टंटसारखं वाटत होतं. परंतु कारमध्ये एयरबॅग्स असल्याने अभिनेत्याला फारशी दुखापत झालेली नाही. प्रियासच्या ड्रॉयव्हरच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. अभिनेत्याच्या घरापासून अवघ्या एका मैलाच्या अंतरावर हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Hollywood

    पुढील बातम्या