• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • धक्कादायक! अभिनेत्याने चुकून केला गोळीबार; सेटवर सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू तर दिग्दर्शक गंभीर जखमी

धक्कादायक! अभिनेत्याने चुकून केला गोळीबार; सेटवर सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू तर दिग्दर्शक गंभीर जखमी

हॉलिवूड चित्रपट 'रस्ट'च्या सेटवर एक धक्कादायक घटना घडली आहे.

 • Share this:
  मुंबई,21ऑक्टोबर- हॉलिवूड चित्रपट 'रस्ट'च्या सेटवर एक धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकन अभिनेता एलेक बाल्डविनने चुकून गोळी चालविल्याने एका सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाला आहे, तर यामध्ये एक दिग्दर्शक जखमी झाला आहे.खळबळजनक गोष्ट म्हणजे याच बंदुकीचा वापर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये केला जात होता. ही समोर येताच एकच खळबळ माजली आहे. न्यू मेक्सिकोमधील बोनान्स क्रिक रेंच सेटवर ही धक्कादायक घटना गुरुवारी २१ ऑक्टोबर रोजी घडली आहे. हॉलिवूड अभिनेता एलेक बाल्डविन आपल्या आगामी 'रस्ट' करत होता. यामध्ये ऍक्शन सीन शूट करण्यासाठी काही बंदुकींचा वापर देखील केला जात होता. अशातच अभिनेता बाल्डविनकडून एका प्रॉप गनमधून ही गोळी सुटली होती. या गोळीबारात चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर हलिन हचिन्स या या ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर ४८ वर्षीय दिग्दर्शक जोएल सुजा जखमी झाले आहेत. यामध्ये हलिन हचिन्सला हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तर जोएल सुजा यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (हे वाचा:आज काचेच्या आडून आर्यनने घेतली बापाची भेट; प्रत्यक्ष भेटीसाठी मोठी प्रतीक्षा) पोलिसांचा तपास सुरु आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अजूनही अपराधी गुन्हा नोंद केलेला नाही.या प्रॉप गनमध्ये कोणत्या प्रकारचा दारूगोळा भरण्यात आला होता. याचा तपास सुरु आहे. मात्र या सर्व प्रकरणावर अभिनेता बाल्डविन,सुजा आणि सेटवरील इतर कर्मचाऱ्यांनी मौन बाळगला आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर हलिन हचिन्सला श्रद्धांजली दिली जात आहे.हलिन हचिन्सचे सहकारी मित्र जेम्स कलम, जॅक कॅसवेल आणि टीना प्रेस्ली बोरेकने अत्यंत भावुक शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे. हलिन हचिन्स ही एका सैनिक पित्याची मुलगी होती. ती हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक उगवती तारका होती.
  Published by:Aiman Desai
  First published: