मोदी सरकारनंतर आता ‘टर्मिनेटर’ही परतला, 64 लाख वेळा पाहिला गेला हा VIDEO

काही दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात अज्ञात व्यक्तिने आर्नल्डला मागून लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

News18 Lokmat | Updated On: May 25, 2019 02:28 PM IST

मोदी सरकारनंतर आता ‘टर्मिनेटर’ही परतला, 64 लाख वेळा पाहिला गेला हा VIDEO

मुंबई, 25 मे- नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा निवडणूकीत एक हाती सत्ता मिळवल्यानंतर अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्याचे माजी राज्यपाल आर्नल्ड श्वार्जनेगरचंही मोठ्या पडद्यावर दमदार आगमन झालं आहे. आर्नल्ड लवकरच सुपरहिट टर्मिनेटर सिनेमाच्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. ७१ वर्षीय या अभिनेत्याच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा टर्मिनेटरचा Terminator Dark fate या सीक्वलचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला.

ज्युनिअर एनटीआरचं मूळ नाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण, जाणून घ्या त्याच्याशी निगडीत या 5 गोष्टी

काही दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात अज्ञात व्यक्तिने आर्नल्डला मागून लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या सिनेमाच्या टीझरमुळे आर्नल्ड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या नव्या सिनेमात आर्नल्डची मुख्य भूमिका नसली तरी त्याच्यासोबत पहिल्या सिनेमात दिसलेली अभिनेत्री लिंडा हॅमिलटनची (६२) महत्त्वपूर्ण भूमिका यात आहे.

प्लॅस्टिक सर्जरीनंतर या अभिनेत्रींचा चेहराच बदलला, त्यांना पाहिल्यावर तुम्हीही घाबराल!

2015 नंतर टर्मिनेटर सिनेमांची वेगळ्या पद्धतीने निर्मिती करण्यात आली. या सिनेमांनी चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शनही केलं. Tenminator Genesys सिनेमाच्या यशानंतर जवळपास चार वर्षांनी टर्मिनेटरचा पुढचा भाग प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे भारतात लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर टर्मिनेटर सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला. नरेंद्र मोदी यांच्या दमदार कमबॅकप्रमाणेच टर्मिनेटर सिनेमानेही सोशल मीडियावर अफलातून कमबॅक केलं आहे.

Loading...

शाहीदची अशी अवस्था यापूर्वी कधीच पाहिली नसेल, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 25, 2019 02:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...