मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Playboy मॅन्शनमध्ये Sex साठी दिलं जात असे ड्रग्ज! Ex-प्लेमेटने केला धक्कादायक खुलासा

Playboy मॅन्शनमध्ये Sex साठी दिलं जात असे ड्रग्ज! Ex-प्लेमेटने केला धक्कादायक खुलासा

दिवंगत हेफनर यांना एकेकाळी डेट करणारी आणि 2001 ते 2008 पर्यंत ती ह्यू हेफनर यांची प्लेमेट असणारी हॉली मॅडिसन (Holly Madiso ) सध्या चर्चेत आली आहे. सीक्रेट्स ऑफ प्लेबॉय (Secrets of Playboy) या आगामी डॉक्युसिरीजची एक नवीन क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये मॅडिसनने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

पुढे वाचा ...

  मुंबई, 10 डिसेंबर: प्लेबॉय मासिकाचे (Playboy magazine) संस्थापक ह्यू हेफनर (Hugh Hefner) यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले होते. 1953 मध्ये त्यांनी या मासिकाची सुरुवात केली होती. हे मासिक त्यामध्ये असणाऱ्या कंटेंटमुळे खूप लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, दिवंगत हेफनर यांना एकेकाळी डेट करणारी आणि 2001 ते 2008 पर्यंत ती ह्यू हेफनर यांची प्लेमेट असणारी हॉली मॅडिसन (Holly Madison) सध्या कशामुळे चर्चेत आली आहे? सीक्रेट्स ऑफ प्लेबॉय (Secrets of Playboy) या आगामी डॉक्युसिरीजची (docuseries) एक नवीन क्लिप समोर आली आहे, ज्यामध्ये मॅडिसनने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

  सीक्रेट ऑफ प्लेबॉय मध्ये लैंगिक शोषण, अंमली पदार्थांचे सेवन, वेश्या व्यवसाय, आत्महत्या, खून यासारख्या गंभीर बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यातच आता अमेरिकन मॉडेल आणि टीव्ही सेलिब्रेटी हॉली मॅडिसनने नुकताच खळबळजनक खुलासा केला आहे. प्लेबॉय मासिकाचे संस्थापक ह्यू हेफनरची गर्लफ्रेंड असताना ती कोणत्या परिस्थितीतून जात होती, हे तिने सांगितले आहे. तिने तिचे केस का कापले, हेही सांगितले. एक्स प्लेमेट ह्यू हेफनरच्या प्लेबॉय मॅन्शनमध्ये राहत असतानाचा अनुभवही तिने शेअर केला आहे.

  हे वाचा-VIDEO : हार्ट अटॅक कसा येतो? जॉन अब्राहमने पाजळलं ज्ञान; मेडिकलचे विद्यार्थी शॉक

  प्लेबॉय मॅन्शनमध्ये राहण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना मॅडिसन म्हणाली, 'मला असे वाटले की मी काही गोष्टींच्या चक्रात अडकले आहे. मला काय करावे, हे कळत नव्हते. एक वेळ अशी आली की मी निराशेत चालले होते. इतरांसारखे दिसणे आवश्यक आहे, असे मला वाटू लागले होते. काही महिलांसोबत 6 महिने राहिल्यानंतर मी माझे केस कापले. माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी माझे लांब सोनेरी केस कापले.' ती पुढे म्हणाली, 'हेफनर माझ्या नवीन लूकवर खूश नव्हते. मी जेव्हा माझे केस कापले तेव्हा ते माझ्यावर ओरडत होते. ते म्हणाले की, तुझा हा लूक मला चीप आणि जुना दिसत आहे.'

  हेफनरच्या रागाबद्दल हॉली मॅडिसनने जे काही सांगितले, त्याला तिचा मित्र जोनाथन बेकरने (Jonathan Baker) दुजोरा दिला आहे. तर, हेफनरची एक्स प्लेमेट मार्क्वार्डने (Marquardt) सांगितले की, 'हेफनर यांना मुलींनी लाल लिपस्टिक लावलेली आवडत नव्हती. एखादी मुलगी लाल लिपस्टिक लावून आल्यानंतर ते तिला लिपस्टिक ताबडतोब पुसण्यास सांगत. मॅडिसन तणावाखाली जात असल्याचे मला स्पष्टपणे दिसत होते. ती दु:खी होती.'

  हे वाचा-या PHOTOS मध्ये तुम्ही कतरिनाची एंगेजमेंट रिंग नोटीस केली का? इतकी आहे किंमत

  तसेच 1976-1981 मधील हेफनरची प्लेमेट असलेल्या सोंड्रा थिओडोरने (Sondra Theodore) एक मोठा खुलासा केला. त्याच्या मते, 'हेफनर आपण ड्रग्सशी संबंधित नसल्याचे भासवत होते. पण ते पूर्णपणे खोटे होते. क्वाल्यूड्सचा (Quaaludes) वापर सेक्ससाठी केला जात असे. मेल्सला माहीत होते की मुलींना क्वाल्युड्स दिल्यानंतर तो त्यांना काहीही करायला लावू शकतो. हेफनरवर महिलांना ड्रग्ज दिल्याचा आरोप आहे.' ह्यू हेफनर यांचे वयाच्या 91 वर्षी निधन झाले आहे. अलिशान आणि वादग्रस्त लाइफस्टाइलमुळे हेफनर हे नेहमीच चर्चेत राहत होते.

  First published: