होळी- रंगपंचमीला या मालिका पाहणं विसरू नका

रंगपंचमीच्या दिवशी लोक त्यांच्यातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्याच गोष्टीचा विजय होतो असं म्हंटलं जातं.

  • Share this:

सगळीकडे रंगपंचमी आणि होळीची तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी लोक त्यांच्यातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्याच गोष्टीचा विजय होतो असं म्हंटलं जातं. कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘घाडगे & सून’, ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’, ‘नवरा असावा तर असा’ आणि ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेमध्ये होळी आणि रंगपंचमीचे विशेष भाग या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

घाडगे & सून मालिकेमध्ये कियारा गरोदर नसल्याचे सत्य अक्षयसमोर आले असून तो हे सत्य घरच्यांना सांगू शकत नाही. याच कारणामुळे त्याच्या वागण्यामध्ये झालेला बदल,चिडचिड ही अमृता, माई आणि घरातील इतरांना दिसून येते आहे. या आठवड्यामध्ये होळीच्या दिवशी कियारीचं हे सत्य अमृतासमोर येणार आहे.

कियाराने घाडगे परिवारासोबत आणि अमृतासोबत केलेलं इतकं मोठं कारस्थान ती घरच्यांना आणि अक्षयला सांगू शकेल का? कोणत्या अडचणी तिच्यासमोर येतील? आणि हे समजल्यावर माई आणि घरातील इतर सदस्य स्वत:ला कसे सावरतील हे पाहणे रंजक असणार आहे. तसेच रंगपंचमीदेखील घाडगे सदनमध्ये साजरी केली जाणार आहे.

Loading...

सगळ्यात वेगळ्या प्रकारे होळी आणि रंगपंचमी नवरा असावा तर असा या कार्यक्रमामध्ये साजरी करण्यात येणार आहे. हर्षदा खानविलकर हा सण साजरा करण्यासाठी खास वरळी कोळीवाड्यात गेली. तेथील कुटुंबासोबत हा सण हर्षदा मोठ्या उत्साहत साजरा करणार आहे. या दरम्यान हर्षदा म्हणाली की, हा सण त्यांच्यासाठी देवळीपेक्षा मोठा असतो.

या सणानिमित्त महिला आणि पुरुष खास पारंपारिक पोशाख परिधान करतात तसेच होळी कशाप्रकारे साजरी केली जाते ते देखील त्यांनी यावेळी सांगितली. तेथील रंगपंचमीदेखील तितकीच खास असते. रंगपंचमीसाठी रंगाची उधळण न करता मजेशीर खेळ खेळले जातात. तेव्हा नवरा असावा तर असा या कार्यक्रमाचा हा विशेष भाग नक्की पाहा.

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्येदेखील प्रेक्षकांना होळी आणि रंगपंचमीची धम्माल मस्ती पाहायला मिळणार आहे. सगळे खूप उत्साहात रंगपंचमी साजरी करणार आहेत. याच दरम्यान लक्ष्मीला अबोलीच्या कारस्थानांबद्दलही कळणार आहे. अजिंक्यला लक्ष्मी कशी वाचवेल? ही रंगपंचमी मल्हार, अबोली आणि लक्ष्मीच्या आयुष्यात कोणते बदल घेऊन येईल हे नक्की पाहा.

मालिकांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बाळूमामा मालिकेमध्ये होळी पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. तेव्हा नक्की पाहा लाडक्या मालिकांचे हे विशेष भाग या आठवड्याच संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून फक्त कलर्स मराठीवर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 20, 2019 06:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...