आई-बाबांकडे 'हे' सिनेमे दाखवायचा नक्की हट्ट करा

आज बालदिन. बाॅलिवूड आणि मराठीत छोट्यांवर बरेच सिनेमे आलेत. अशाच काही लोकप्रिय सिनेमांवर एक नजर

  • Share this:

'तारे जमी पर' सिनेमा सुपरडुपर हिट झालेला. दर्शिल सफारीनं तर कमाल केलेली. डायलेक्सिया झालेल्या मुलाची गोष्ट पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. लहान मुलांच्या सिनेमापैकी सर्वात हिट असलेला हा सिनेमा म्हणता येईल.

2011मध्ये रिलीज झालेला स्टेन्ले का डब्बा एकदम साधा सिनेमा. अमोल गुप्तेनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा स्टॅन्लेभोवती फिरतो. आई-वडील नसल्यानं तो शाळेत डबा आणू शकत नाही आणि त्यातूनच मनाला स्पर्श करणारं कथानक पुढे जातं.

'भूतनाथ रिटर्न्स' हा सिनेमा भूतनाथचा सिक्वल. सिनेमा खूप चालला नाही. पण अमिताभ बच्चन यांचा भूतनाथ छोट्यांना हसवून जातो.

बालदिनानिमित्त 2014ला रिलीज झालेला 'एलिझाबेथ एकादशी'ही असाच छोट्यांचा निरागसपणा दाखवणारा सिनेमा. परेश मोकाशी दिग्दर्शित या सिनेमाचा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्येही गौरवलं गेलंय.

नागराज मंजुळेंचा फॅण्ड्री सिनेमा तर मुलांच्या भावविश्वाबरोबर सामाजिक भाष्य करणारा. जब्याचं जग, त्याचं प्रेम, समाजातली दरी या सगळ्या गोष्टींंनी अनेक पुरस्कार पटकावले. जब्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय.

आता 16 नोव्हेंबरला रिलीज होणारा नाळ. त्याची निर्मिती केलीय नागराज मंजुळेंनी. सुधाकर रेड्डी दिग्दर्शित नाळचा ट्रेलर रिलीज झालाय. एका छोट्या मुलाच्या भावविश्वाभोवती हा सिनेमा फिरतोय. ट्रेलरमधून एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे मुलाला आपली आई आपल्यावर प्रेम करत नाही असं वाटतंय. ती सारखी त्याच्या अंगावर ओरडते, त्याचा राग राग करतेय. त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारची असुरक्षितता, प्रेमाची आस जाणवतेय. हा ट्रेलरच काळजाला हात घालतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2018 06:36 AM IST

ताज्या बातम्या