मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Box office | प्रत्येक चित्रपटाचं भविष्य ठरवणाऱ्या बॉक्स ऑफिसचा रोमहर्षक इतिहास माहिती आहे का?

Box office | प्रत्येक चित्रपटाचं भविष्य ठरवणाऱ्या बॉक्स ऑफिसचा रोमहर्षक इतिहास माहिती आहे का?

History of box office : आज कोणत्याही चित्रपटाचं भविष्य बॉक्स ऑफिस (Box Office) ठरवत असतो. परिणामी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि प्रेक्षकांचंही लक्ष बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे लागलेलं दिसतं. मात्र, या बॉक्स ऑफिसचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

History of box office : आज कोणत्याही चित्रपटाचं भविष्य बॉक्स ऑफिस (Box Office) ठरवत असतो. परिणामी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि प्रेक्षकांचंही लक्ष बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे लागलेलं दिसतं. मात्र, या बॉक्स ऑफिसचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

History of box office : आज कोणत्याही चित्रपटाचं भविष्य बॉक्स ऑफिस (Box Office) ठरवत असतो. परिणामी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि प्रेक्षकांचंही लक्ष बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे लागलेलं दिसतं. मात्र, या बॉक्स ऑफिसचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

पुढे वाचा ...

मुंबई, 26 नोव्हेंबर : बॉलिवूड (Bollywood) असो अथवा हॉलिवूड (Hollywood), प्रत्येक चित्रपटसृष्टीसाठी बॉक्स ऑफिस (Box Office) हा महत्त्वाचा घटक असतो. एखादा चित्रपट यशस्वी ठरला की अयशस्वी, याचं मूल्यमापन बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीवरून केलं जातं. त्यामुळे बॉक्स ऑफिस हा चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि प्रेक्षकांसाठी खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीवरून जसं चित्रपटाचं भवितव्य ठरतं, तसंच चित्रपटांतल्या कलाकारांच्या करिअरचंदेखील. एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री हिट आहे की फ्लॉप याचा अंदाजदेखील त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कसं कलेक्शन केलं यावरून लावला जातो. त्यामुळे बॉक्स ऑफिसला चित्रपटसृष्टीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. बॉक्स ऑफिस म्हणजे काय, त्याची सुरुवात कधीपासून झाली, त्याचा इतिहास काय असे अनेक प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडलेच असतील. बॉक्स ऑफिस या संकल्पनेला मोठा इतिहास (History) आहे. काळानुरूप त्यात बदल होत गेले आहेत.

सध्या एखाद्या चित्रपटाची किंवा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांची एकूण आर्थिक कमाई (Earning) किती आहे, बॉक्स ऑफिसवर त्यांची स्थिती काय आहे, हे आता अगदी एका क्लिकवर समजू शकतं. परंतु, एक काळ असा होता की या संकल्पनेचा उपयोग केवळ ठराविक व्यक्तींसाठी केला जायचा. सध्याच्या काळात बॉक्स ऑफिसचा अहवाल हा सर्व डिजीटल प्लॅटफॉर्मवर (Digital Platforms) उपलब्ध असतो. बॉक्स ऑफिस, बॉक्स ऑफिस मोजो, अ बॉक्स ऑफिस, बॉक्स ऑफिस इंडिया, कोईमोई आणि शोबिझ डेटा यांसारख्या अनेक वेबसाइट्सवर चित्रपटांच्या कमाईची माहिती उपलब्ध असते. चित्रपट रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी आतापर्यंत त्यानं किती कमाई केली, याचे आकडे या वेबसाइट्सवर मिळू शकतात. 90 च्या दशकातले चित्रपट कसे तरी 100 कोटींची कमाई करत. परंतु 2000 नंतर हा आकडा चित्रपट यशस्वी होण्याची ओळख बनला.

Naga Chaitanya शी घटस्फोटानंतर Bisexual होणार Samantha Prabhu; Philip John साठी घेतला मोठा निर्णय

बॉक्स ऑफिस संकल्पना कधी सुरू झाली?

खरं तर बॉक्स ऑफिस ही संकल्पना 1786 मध्ये सुरू झाली. त्या काळात थिएटरमधल्या काही सीट्स (Seats) आरक्षित असायच्या. या सीटच्या तिकीट विक्रीसाठी वेगळी यंत्रणा असायची. थिएटरच्या जवळ बॉक्सच्या आकाराचा एक स्टॉल (Stall) तिकीट विक्रीसाठी लावला जायचा. हीच बॉक्स ऑफिस या संकल्पनेची सुरुवात म्हणता येईल. परंतु, त्यावेळी या संकल्पनेला बॉक्स ऑफिस हे नाव मिळालं नव्हतं. 16 व्या शतकात इंग्लंडमधल्या (England) एलिझाबेथ थिएटरमुळे ही संकल्पना बॉक्स ऑफिस म्हणून ओळखली जाऊ लागली. थिएटरच्या माध्यमातून झालेली कमाई एका बॉक्समध्ये ठेवली जात असे. यामुळे किती कमाई झाली याची आकडेवारी उपलब्ध होत असे.

उत्तर अमेरिकेत (North America) बॉक्स ऑफिसच्या काम करण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाल्याचं दिसून आलं. येथे रिलीज होणाऱ्या चित्रपटांच्या कमाईची विभागणी दोन भागांत करण्यात आली. यातील पहिला हिस्सा हा युनायटेड स्टेट्स (United States) आणि कॅनडात रिलीज होणाऱ्या चित्रपटांचा होता. याला डोमेस्टिक कलेक्शन (Domestic Collection) असं म्हटलं जात. दुसऱ्या हिश्श्यात परदेशात रिलीज होणाऱ्या चित्रपटांच्या कमाईचा समावेश होता. याला फॉरीन बॉक्स ऑफिस (Foreign Box Office) कलेक्शन असं म्हटलं जात.

महागड्या कार, कोट्यावधींचे फ्लॅट्स पाहा शाहिद कपूरकडे आहे किती संपत्ती

कम्प्युटरच्या माध्यमातून बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती ठेवण्याची सुरुवात सर्वप्रथम अमेरिकेत झाली. 1960 च्या उत्तरार्धात येथे आयबीएम 360 कम्प्युटरच्या माध्यमातून चित्रपटांच्या कमाईचा हिशोब ठेवण्यास सुरुवात झाली. एक जानेवारी 1968 रोजी अमेरिकेतल्या 24 शहरांमध्ये रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांचं रेकॉर्ड कम्प्युटरच्या माध्यमातून ठेवलं गेलं; मात्र, आता चित्रपटांच्या कमाईबाबतची सविस्तर माहिती डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर अगदी क्षणार्धात पाहायला मिळते. याचाच अर्थ आता बॉक्स ऑफिस हेदेखील डिजीटल झालं आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही.

First published: