S M L

मिस वर्ल्ड मानुषीचं 11 गावांच्या खाप पंचायती करणार स्वागत

या हरियाणाच्या छोरीचं आता तिच्या गावी 11 खाप पंचायती मोठ्या जल्लोषात स्वागत करणार आहे.

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2017 01:45 PM IST

मिस वर्ल्ड मानुषीचं 11 गावांच्या खाप पंचायती करणार स्वागत

28 नोव्हेंबर : हरियाणामध्ये खाप पंचायत म्हणजे काय हे अवघ्या देशाने पाहिलंय. आता याच धरतीतून जगाला गवसणी घालणाऱ्या  मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने हरियाणाच नाव सातासुमुद्रापार नेलं. या हरियाणाच्या छोरीचं आता तिच्या गावी 11 खाप पंचायती मोठ्या जल्लोषात स्वागत करणार आहे.

जात पंचायतीच्या विळख्यात आजही ग्रामीण गाडा अडकलेला आहे. जात पंचायतीच्या जाचाच उदाहरण जर समोर आले तर सर्वात प्रथम खाप पंचायतीचं नाव पुढे येतं. पण हरियाणाची छोरी मानुषी छिि ल्लरच्या यशामुळे खाप पंचायतीने तिचं स्वागत करण्याचा निर्णय घेतलाय. मानुषीचं जगभरात स्वागत होत असतानाच आता ती तिच्या गावी जाणार आहे. छिल्लर-छिकारा खाप या पंचायतीनं मानुषीच्या जोरदार स्वागताची तयारी सुरू केली आहे.

11 गावांच्या छिल्लर छिकार खाप पंचायतींनी मिळून त्यांच्या या लाडक्या मुलीचं स्वागत करण्याच ठरवलं आहे.तिच्या स्वागताबरोबरच दिल्लीच्या निजामपुर गावात जालेल्या छिल्लर-छिकार खाप पंचायतीत अनेक वाईट प्रथा मोडून चांगल्या प्रथांचाही प्रारंभ करण्यात येणार आहे.

पंचायतीने गावात रात्री होणाऱ्या लग्न सोहळ्यांवर निर्बंध घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लग्न समारंभात होणारा वायफळ खर्च टाळण्यासाठी डीजे, लग्नात दारु पिवून धिंगाना घालणं, फटाके फोडणं या सगळ्यावरही बंदी घालण्यात येणार आहे.

खाप पंचायतीचे अध्यक्ष बलवान छिल्लर यांनी म्हटलं की, 'मानुषीने आपलं गाव, गोत्र, प्रदेश आणि देशाच नाव उज्ज्वल केलं आहे. मानुषीचा आदर्श समोर ठेऊन खापच्या अन्य मुलीही तिला प्ररित होऊन काम करतील.' त्यामुळे मानुषीच्या यशाने सगळ्यांची मान अभिमानाने उंचावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 01:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close