Hirkani Trailer : बाळाच्या प्रेमापोटी संकटांना मात देणाऱ्या आईचा थरारक प्रवास!

Hirkani Trailer : बाळाच्या प्रेमापोटी संकटांना मात देणाऱ्या आईचा थरारक प्रवास!

'प्रत्येक आई असतेच... हिरकणी' अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर अक्षरशः आपल्या काळजाचा ठाव घेतो.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : सध्या मराठी सिनेमांमध्येही वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. 'कच्चा लिंबू' या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर उत्सुकता आहे ती प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकरणी' या सिनेमाची...काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची एकच नव्हे तर दोन मोशन पोस्टर रिलीज झाली होती. त्यानंतर आता हिरकणीचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिरकणीच्या भूमिकेत दिसणार आहे. 'प्रत्येक आई असतेच... हिरकणी' अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर कोणाच्याही काळजाचा ठाव घेईल असाच आहे.

बाळाच्या ओढीनं धोकादायक असा कडा उतरुन घरी परतणाऱ्या हिरकणीची कविता तर शालेय वयात सर्वांनीच अभ्यासली. पण आता हीच कथा प्रसाद ओक मोठ्या पडद्यावर मांडत आहे. गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर बाळाच्या प्रेमापोटी गडाच्या पश्चिमेचा धोकादायक असा कडा उतरणाऱ्या हिरकणीचा थरारक प्रवास या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

लिसा हेडननं बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

हा ट्रेलर अक्षरशः आपल्या काळजाचा ठाव घेतो. कडा उतरत असताना स्वतःच्या जीवची पर्वा न करत प्रत्येक संकटावर मात करणाऱ्या आईची कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. अभिनेता प्रसाद ओकनं या सिनेमाच्या ट्रेलरची माहिती त्याच्या ट्विटरवरुन दिली. त्यानं लिहिलं, 'साडेतीनशे वर्षांपूर्वी कोजागिरीच्या रात्री घडला होता कल्पनेपलिकडचा पराक्रम; म्हणूनच आज कोजागिरीच्याच दिवशी घेऊन आलोय हिरकणीच्या साहसगाथेची झलक!'

...अन् अचानक ललित प्रभाकरने सर्वांसमोर पर्ण पेठेला उचलून मेकअप रूममध्ये नेलं!

या सिनेमाबाबत प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने प्रसाद ओक आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त राजेश मापुसकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाठ्यपुस्तकातील हिरकणीला रुपेरी पडद्यावर साकारणार आहे आणि सोनालीच्या माध्यमातून हिरकणीला मिळालेला चेहरा लोकांच्या नक्कीच कायमस्वरुपी स्मरणात राहील याची खात्री निर्मात्यांना वाटते आहे.

अभिनेत्री अमिषा पटेलला कधीही होऊ शकते अटक, वाचा काय आहे कारण

 

View this post on Instagram

 

नवऱ्यासाठी अन्यायाचा डोंगर सर करून गेली ती ‘बकुळा’ आणि बाळासाठी अंधार कडा उतरून आलेली ‘हिरकणी’ असा १२ वर्षांचा प्रवास. कपाळावरची चिरी, माने वरचा अंबाडा, कंबरेला खोचलेला पदर आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाचा आदर आज एका तपा नंतरही कायम आहे. माय बाप... या ‘हिरकणी’ वर आणि इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक भुमिकेवर असंच प्रेम राहूद्या जय भवानी जय शिवराय 🙏🏻 P.S. १२ वर्षांनपूर्वी १२ ॲाक्टाेबर ला माझा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला आणि मराठी चित्रपट सृष्टीत अभिनेत्री म्हणून माझा प्रवास सुरू झाला.

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी निभावली आहे. येत्या दिवाळीत म्हणजेच 24 ऑक्टोबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

सासरी घडलं तरी काय? ज्यामुळे ढसाढसा रडली प्रियांका चोप्रा VIRAL VIDEO

=======================================================

पवारांचा हाच तो VIDEO; ज्यावर PM मोदींनी केली खुमासदार टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2019 03:43 PM IST

ताज्या बातम्या