महाराजांनी गौरवलेल्या एका आईची साहसकथा, 'हिरकणी'चं Motion Poster रिलीज

महाराजांनी गौरवलेल्या एका आईची साहसकथा, 'हिरकणी'चं Motion Poster रिलीज

महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा "हिरकणी" येत्या दिवाळीत 24 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • Share this:

मुंबई, 30 ऑगस्ट : सध्या मराठी सिनेमांमध्येही वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. 'कच्चा लिंबू' या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर उत्सुकता आहे ती प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकरणी' या सिनेमाची... या चित्रपटाचं  मोशन पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने प्रसाद ओक आणि राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त राजेश मापुसकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

अभिनेता प्रसाद ओकनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन 'हिरकणी' सिनेमाचं हे मोशन पोस्टर शेअर केलं. हे पोस्टर शेअर करताना त्यानं, 'आई भवानीचा आशीर्वाद घेऊन... छत्रपती शिवराय लढले वाघासारखे...आणि राजांचे संस्कार घेऊन... एक आई झाली बाळासाठी वाघीण... महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा "हिरकणी" येत्या दिवाळीत...२४ ऑक्टोबर रोजी' असं कॅप्शन दिलं आहे.

View this post on Instagram

आई भवानीचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवराय लढले वाघासारखे आणि राजांचे संस्कार घेऊन एक आई झाली बाळासाठी वाघीण... महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा "हिरकणी" येत्या दिवाळीत...२४ ऑक्टोबर रोजी #हिरकणी #Hirkani #24Oct @iradaentertainment in association with @mapuskar (MAGIJ Picture) Presents @hirkanithefilm @chinmay_d_mandlekar @oakprasad Lawrence D'Souza #FalguniPatel

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

"प्रत्येक आई असतेच... हिरकणी" ही टॅगलाईनही आकर्षक आहे. मुलासाठी अतिशय मोठं धाडस केलेल्या आईची ऐतिहासिक गोष्ट सिनेमात मांडण्यात आल्याचं आपल्याला मोशन पोस्टरवरून कळतं. गडाच्या बुरुजावर उभे असलेल्या छत्रपती शिवरायांपासून ते खांद्यावर बाळ घेऊन उभी असलेली हिरकणी आपल्याला पोस्टरमध्ये दिसते. सिनेमाचं मोशन पोस्टर सर्वांची उत्सुकता वाढवणारं आहे. त्यामुळे हा सिनेमाही प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव ठरेल यात शंका नाही. चित्रपटात कलाकार कोण आहेत हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी निभावली आहे. स्वरूप एंटरटेनमेंटचे आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार हे या चित्रपटासाठी  मार्केटिंगचे काम पाहत आहेत.येत्या दिवाळीत म्हणजेच 24 ऑक्टोबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

======================================================================

हिटलरसमोर जर्मनीला धूळ चारणारे मेजर ध्यानचंद यांची रोमहर्षक कहाणी

Published by: Megha Jethe
First published: August 30, 2019, 4:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading