बडा धमाका! एकता कपूरविरोधात हिंदुस्तानी भाऊची पोलिसात तक्रार; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

बडा धमाका! एकता कपूरविरोधात हिंदुस्तानी भाऊची पोलिसात तक्रार; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

हिंदुस्तानी भाऊने (hindustani bhau) याआधी बॉलिवूडमध्ये मोठा धमाका करणार असल्याचं सोशल मीडिया पोस्टमधून सांगितलं होतं.

  • Share this:

मुंबई, 01 जून : बिग बॉसचा 13 सीझन गाजवणारा हिंदुस्तानी भाऊ (hindustanibhau) मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्यानं युट्यूबरकॅरी मिनाटीला पाठिंबा दिल्यानं चर्चेत आला होता. पण आता त्यानं निर्माती एकता कपूर (ekta kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (shobha kapoor) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करून मोठा धमाका केला आहे.

हिंदुस्तानी भाऊने याआधी एका सोशल मीडिया पोस्टमधून त्यानं बॉलिवूडमध्ये मोठा धमाका करणार असल्याचं सांगितलं होतं. मोठ्या व्यक्तीचा पदार्फाश करणार असल्याचं त्यानं म्हटलं होतं मात्र ही व्यक्ती नेमकी कोण हे त्यानं सांगितलं नव्हतं. यानंतर या पोस्टबाबत बरीच चर्चा सुरू होती.

अखेर आता त्याने एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊनं केला आहे. या दोघींनीही निर्मिती केलेल्या एका वेबसीरिजमध्ये एका जवानाची पत्नी तो ड्युटीवर जॉईन झाल्यानंतर प्रियकराला घरी बोलावते, असं दाखवण्यात आल्याचा दावा हिंदुस्तानी भाऊने केला आहे. हा भारतीय जवानांचा अपमान आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचा - नर्गिस यांनी ब्लेडनं हात कापून घेत केला होता आत्महत्येचा प्रयत्न, वाचा काय होतं

हिंदुस्तानी भाऊ म्हणजे  विकास फाठक.  पुलवामा हल्ल्यानंतर भारताविरोधात बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी विकासनं व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला, त्यानंतर विकासनं 'हिंदुस्थानी भाऊ'या नावानं व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.

हे वाचा - 'या' अभिनेत्रीच्या घरात कोरोनाचा शिरकाव; संपूर्ण कुटुंबाला व्हायरसची लागण

First published: June 1, 2020, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading