• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सलमान खानसाठी टीव्ही अभिनेत्रीची रोमँटिक पोस्ट; म्हणते, 'दिल धडकने दो.....'

सलमान खानसाठी टीव्ही अभिनेत्रीची रोमँटिक पोस्ट; म्हणते, 'दिल धडकने दो.....'

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hassandani) नुकतीच तिच्या आवडत्या स्टारला भेटली. हा स्टार म्हणजे सर्व मुलींचा लाडका सलमान खान आहे. सलमानसोबतचे फोटो शेअर करत तिनं रोमँटिक पोस्ट देखील लिहिली आहे.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर - लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hassandani) नुकतीच तिच्या आवडत्या स्टारला भेटली. अनिता ही सुपरस्टार सलमान खानची (Salman Khan) खूप मोठी फॅन आहे. 'नागिन' (Nagin Serial ) मालिकेतील या अभिनेत्रीने शनिवारी सलमानची भेट घेतली. आपल्या आवडत्या व्यक्तीची भेट झाली तर तो जो आनंद चेहऱ्यावर सहज दिसतो. मग तो व्यक्ती जर बॉलिवूड स्टार सलमान खान असेल तर त्याचा आनंद तर न्याराच आहे. अनिताच्या बाबतीतही असंच झालं आहे. आपला आनंद व्यक्त करत तिनं सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. दोघांची भेट कशी झाली याचा उल्लेख अनिताने केलेला नाही. पण दोघेही कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचं दिसतंय. अनिता हसनंदानीने सलमान खान भेटल्याबद्दल तिच्या चाहत्यांना इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून अतिशय मनोरंजक पद्धतीने सांगितलं आहे. तिनं आधी कारमधील सेल्फी शेअर करत लिहिले आहे की, 'मी माझ्या सर्वात आवडत्या वक्तीला भेटायला तयार आहे. कोणीतरी आहे ज्याच्यावर मी सर्वात जास्त प्रेम करतो. तुम्ही काही अंदाज लावू शकता का.'' इन्स्टा स्टोअरी पाहिल्यानंतर अनिता कोणाला भेटणार आहे याचा अंदाज चाहत्यांना लागलेला नाही. चाहत्यांनी काही अंदाज लावण्याआधीच, काही तासांनंतर अनिताने अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर ती कोणत्या आवडत्या व्यक्तीबद्दल बोलत आहे, हे सर्वांना समजलं आहे. वाचा :'सोनम - रिया तुमची आठवण येतेय...'; अनिल कपूर यांची भावनिक पोस्ट अनिता तिचा आवडता स्टार सलमान खानला भेटून खूप आनंदी दिसत असल्याचे फोटोत दिसत आहे. सलमान नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत असल्याचेही तुम्ही या फोटोंमध्ये पाहू शकता. एकाद्या सर्वसामान्य चाहत्याला ज्याप्रमाणे आपल्या आवडत्या स्टारला भेटल्याचा आनंद होतो त्याप्रमाणे अनिता देखील सलमानाला भेटल्याचा आनंद लपवू शकलेली नाही. तिचा हाच आनंद तिनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिन फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'दिल धडकने दो' यासोबतच तिनं आपल्या भावना इमोजीद्वारे व्यक्त केल्या आहेत.
  अनिताने दिवाळीला तिचे फोटो इन्स्टावर पोस्ट केले होते. अभिनेत्री आणि तिचा पती रोहित रेड्डी एकता कपूरच्या पार्टीत सहभागी झाले होते. रोहितने यावेळी पारंपारिक पांढरे धोतर आणि कुर्ता परिधान केला होता, तर अनिता इंडो-वेस्टर्न लुकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. वाचा:साऊथ स्टार Sai Dharam Tej अखेर घरी परतला; 2 महिन्यापूर्वी झाला होता अपघात अनिता 2013 मध्ये बिझनेस मॅन रोहित रेड्डीसोबत लग्न करून संसार थाटला आहे. अनिताने अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. एकता कपूरच्या 'नागिन' या शोमधील तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. अनिताचे फिल्मी करिअर काही खास नव्हते, पण ती टीव्ही इंडस्ट्रीत आपली छाप उमटवण्यात यशस्वी झाली. अनिता 'ये है मोहब्बतें', ‘काव्यांजली’, 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' आणि 'कसम' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: