Home /News /entertainment /

किशोरी शहाणेंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल

किशोरी शहाणेंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून तुम्हीही थिरकाल

किशोरी शहाणे सध्या ‘गुम है किसे के प्यार मैं’ (Ghum Hai Kisi Ke Pyar Mai) या मालिकेत त्या एका मध्यवर्ती भूमिकेत दिसून येत आहेत.

  मुंबई, 17 जून- अभिनेत्री (Actress)  किशोरी शहाणे(Kishori Shahane) यांनी मराठीमध्ये कित्येक उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाला आणि सौंदर्याला महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी नेहमीच दाद दिली आहे. सध्या त्या हिंदी मालिकांमध्ये कार्यरत आहेत. स्टार प्लसवरील ‘गुम है किसे के प्यार मैं’ (Ghum Hai Kisi Ke Pyar Mai)  या मालिकेत त्या एका मध्यवर्ती भूमिकेत दिसून येत आहेत. त्या सतत आपल्या सह कलाकारांशी मजामस्ती करताना दिसून येतात. त्यांच्या डान्सचे अनेक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतं असतात. नुकताच त्यांचा आपल्या एका सह कलाकारासोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये त्या ‘मस्त चाललय आमचं’ या गाण्यावर धम्माल डान्स करत आहेत.
  अभिनेत्री किशोरी शहाणे या मराठी चित्रपटांतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मराठीतील प्रसिद्ध कलाकार अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर यांच्यासोबत त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट केले आहेत. तसेच त्यांनी काही हिंदी चित्रपटही केले आहेत. मात्र सध्या त्या हिंदी मालिकांमध्ये सक्रीय आहेत. ‘गुम है किसीके प्यार मैं’ या स्टार प्लसवरील मालिकेत त्या सध्या काम करत आहेत. सेटवर त्या नेहमीच ऑफस्क्रीन मस्ती करताना दिसून येतात. (हे वाचा:या' चित्रपटासाठी घेतलं फक्त 1 रुपये मानधन; लक्ष्मीकांत बेर्डेंचा अजब किस्सा   ) किशोरी शहाणे या उत्मम अभिनेत्रीसोबतचं एक उत्तम डान्सरसुद्धा आहेत. त्या सतत आपल्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचा ‘गोरे गोरे गालों पे काला काला तील’ हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तर आत्ता ‘मस्त चाललंय आमचं’ हा डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे. यामध्ये त्या आपल्या मालिकेच्या एका सह कलाकारासोबत डान्स करताना दिसून येत आहेत.  या वयातसुद्धा त्या इतक्या सक्रीय असलेले पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत. इतक्या वर्षांनंतरही त्यांच्यात तितकाच उत्साह दिसून येतो.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या