मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

हिना खानला नाही वाढलेल्या वजनाची चिंता; पोस्ट शेअर करत जिंकलं चाहत्यांचं मन

हिना खानला नाही वाढलेल्या वजनाची चिंता; पोस्ट शेअर करत जिंकलं चाहत्यांचं मन

हिना खानने या वर्षी तिच्या वडीलांना गमावलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर काही महिने मानसिकदृष्ट्या तिच्यासाठी अत्यंत खूप चढ -उताराचे होते.

हिना खानने या वर्षी तिच्या वडीलांना गमावलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर काही महिने मानसिकदृष्ट्या तिच्यासाठी अत्यंत खूप चढ -उताराचे होते.

हिना खानने या वर्षी तिच्या वडीलांना गमावलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर काही महिने मानसिकदृष्ट्या तिच्यासाठी अत्यंत खूप चढ -उताराचे होते.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई,21ऑक्टोबर- हिना खान(Hina Khan) छोट्या पडद्यावरील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ये 'रिश्ता क्या कहलाता है' (Yeh rishta kya kehlata hai) या मालिकेतून तिच्या अभिनयाचा प्रवास सुरू केला होता. या मालिकेने तिला अफाट लोकप्रियता मिळवून दिली होती. आणि त्यानंतर तिने ज्या प्रकारे स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं, ते येणाऱ्या सर्वच अभिनेत्रींसाठी एखाद्या प्रेरणेपेक्षा कमी नाही. हिना खान फिटनेस फ्रिक आहे. ती अनेकदा आपले वर्कआउट व्हिडिओ शेअर करत असते.मात्र आता हिना खानने तिच्या फिटनेस आणि बॉडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तिने एक पोस्ट (Instagram Post) लिहिली आहे, ज्यात तिनं सांगितलं आहे की त्याच्यासाठी शारीरिक स्वरूपापेक्षा मानसिक आरोग्य कसं महत्त्वाचं आहे. वडिलांचं निधन- हिना खानने या वर्षी तिच्या वडीलांना गमावलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर काही महिने मानसिकदृष्ट्या तिच्यासाठी अत्यंत खूप चढ -उताराचे होते. कारण ती आपल्या वडिलांशी फारच कनेक्ट होती. एखाद्या मित्रासारखं या दोघांमध्ये बॉन्डिंग होते. हिना नेहमीच आपल्या डॅडी कूलसोबत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. चाहतेही त्यांना भरभरून प्रेम देत होते. मात्र वडिलांच्या अशा अचानक जाण्याने अभिनेत्रीला धक्का बसला होता. दरम्यान, ती सतत तिच्या कामावरही लक्ष केंद्रित करत होती. आता हिना खानने तिचं वाढलेलं वजन आणि मानसिक आरोग्याबद्दल सोशल मीडियावर खुलेपणानं बोललं आहे. (हे वाचा:'जय,तेजस्वी आणि विशाल'ने मला बाहेर काढण्याचा कट रचला'-डोनल बिष्ट) पुन्हा सुरु केलं वर्कआऊट- हिना खानने पुन्हा एकदा तिच्या वर्कआउटमध्ये स्वतःला गुंतवलं आहे, त्यासाठी तिला मानसिक शांती आणि समर्पण आवश्यक आहे. हिना खानने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये लिहिलं आहे की, 'मी गेल्या काही महिन्यांत स्पष्ट कारणांमुळे वजन वाढवलं ​होतं आणि मी खरोखर किती वजन वाढवलं ​​याकडे लक्ष दिलं नाही. माझ्यासाठी मानसिक आरोग्य अधिक महत्वाचं आहे आणि मला फक्त अशा गोष्टी करायच्या होत्या ज्यामुळे मला आनंद होईल. लोक काय म्हणतील किंवा मी कशी दिसते याचा जास्त विचार न करता, कधीकधी तुम्ही जसे आहात तसे व्हा, तुम्हाला जे वाटते ते करा. शेवटी, आयुष्यात काहीही करण्यासाठी, योग्य मानसिक स्थितीत असणं आवश्यक आहे. शारीरिक देखाव्याऐवजी मी आधी मानसिक आरोग्य निवडलं. परंतु आता मी परत आले आहे. (हे वाचा:'Indian Idol 12'फेम पवनदीप-अरूणिता करणार साखरपुडा! 'Manzoor Dil') तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचं झालं तर, हिना खान अलीकडेच बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली होती.तसेच याआधी ती अभिनेता शाहीर शेखसोबत एका व्हिडीओ अल्बममध्ये दिसली होती. हा अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला होता. यादरम्यान ती लेहेंगामध्ये खूप सुंदर दिसत होती. हिना खान नियमित सोशल मीडियावर चाहत्यांशी जोडलेली असते. फोटो, व्हिडीओ, लाइव्ह द्वारे संवाद साधत ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
First published:

Tags: Entertainment, Tv actress

पुढील बातम्या