मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अभिनेत्री हिना खानला त्रास देत असे अनोळखी तरूण, व्हिडीओ पाठवून म्हणायचा...

अभिनेत्री हिना खानला त्रास देत असे अनोळखी तरूण, व्हिडीओ पाठवून म्हणायचा...

हिना खानला तिच्या 'हॅक' या पहिल्या बॉलिवूड सिनेमासारखा थरारक अनुभव रिअल लाइफमध्येही आला आहे.

हिना खानला तिच्या 'हॅक' या पहिल्या बॉलिवूड सिनेमासारखा थरारक अनुभव रिअल लाइफमध्येही आला आहे.

हिना खानला तिच्या 'हॅक' या पहिल्या बॉलिवूड सिनेमासारखा थरारक अनुभव रिअल लाइफमध्येही आला आहे.

  • Published by:  Megha Jethe
मुंबई, 08 फेब्रुवारी : टीव्ही मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान सध्या तिचा बॉलिवूड डेब्यू सिनेमा ‘हॅक्ड’(Hacked)मुळे खूप चर्चेत आहे. सायबर क्राइमवर आधारित असलेला हा सिनेमा 7 फेब्रुवारीला रिलीज झाला. या सिनेमात एक मुलगा हिनाचा मोबाईल हॅक करुन तिला त्रास देताना दाखवण्यात आला आहे. पण असाच अनुभव तिला रिअल लाइफमध्येही आला आहे. पिंकव्हिलाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हिना खाननं तिचा हा रिअल लाइफ अनुभव शेअर केला. ती म्हणाली, ‘मी माझ्या खऱ्या आयुष्यातही असा अनुभव घेतला आहे. एक मुलगा मला खूप त्रास असे. जेव्हा तुम्ही पब्लिक फिगर असता तेव्हा बरेच लोक तुमचे चाहते असतात. त्यामुळे हे लोक अनेकदा दिवसभर तुमच्या घरासमोर उभे राहतात. किंवा तुम्हाला स्टॉक करतात. पण हे चांगलं नसतं.’ Love Story : लग्नाआधी ‘लिव्ह इन’मध्ये होती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दात हिना पुढे म्हणाली, एक मुलगा होता जो मला सतत मेसेज करत असे. ज्याला मी अजिबात ओळखत नव्हते. पण तो मला मोबाइलवर लांबलचक मेसेज पाठवत असे. त्या सर्व मेसेजमध्ये तो खूपच उत्साहित आहे असं मला वाटत असे. त्यामुळे त्याच्याबद्दल अलर्ट झाले. एकदा मी त्याच्या मेसेजला रिप्लाय केला आणि त्याला रिलॅक्स राहायला सांगितलं. पण त्यानं माझं बोलणं ऐकलं नाही. नंतर त्यानं मला धमकी द्यायला सुरुवात केली की एकतर तो हाताची नस कापून घेईल किंवा मग घरातून पळून जाईल. ज्यामुळे मी खूप घाबरले होते. काळा कोटवाला हिरो, ‘निकम’ आता मोठ्या पडद्यावर! हिना सांगते, काही काळानंतर त्या मुलानं मला मेसेज करुन हे सांगायला सुरुवात केली की, मी तुला दुपारी 1 वाजता भेटायला येत आहे. पण त्यानं कधी, कुठे, कसं हे मात्र सांगितलं नाही. त्यावेळी मला घरातून बाहेर पडण्याचीही भीती वाटत असे. त्यानं जवळपास 20 मोबइल नंबर बदलले आणि मला मेसेज केले. काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यानं मेसेज केला होता. त्यावेळी मी त्याच्या नंबर ब्लॉक केलं. हिना खानचा पहिला बॉलिवूड सिनेमा 7 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. याआधी या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हॅकमध्ये सायबर क्राइमसोबतच ग्लॅमरचा तडका आहे. सिनेमाची संपूर्ण कथा ही हिना खान आणि 19 वर्षीय हॅकरभोवती फिरते. जो कॉरपोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या समीराच्या प्रेमात पडतो मात्र तिनं त्याच्या प्रेमाला नकार दिल्यानं त्याचा बदला घेण्यासाठी सायबर क्राइमचा आधार घेतो. विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्काची Instagram वर 'Hi Kiwi' पोस्ट
First published:

Tags: Bollywood, Hina khan

पुढील बातम्या