Home /News /entertainment /

व्हायचं होतं क्रिकेटपटू झाला संगीतकार; या व्यक्तीसाठी हिमेश रेशमिया आला बॉलिवूडमध्ये

व्हायचं होतं क्रिकेटपटू झाला संगीतकार; या व्यक्तीसाठी हिमेश रेशमिया आला बॉलिवूडमध्ये

हिमेश हा बॉलिवूडमधील नामांकित संगीतकार विपिन रेशमिया यांचा मुलगा आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्याच्यावर संगीताचे संस्कार झाले होते.

    मुंबई 23 जुलै: ‘झलक दिखलाजा’ (Jhalak Dikhla) या गाण्यातून नावारुपास आलेला हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) आज बॉलिवूडमधील एक नामांकित गायक, संगीतकार म्हणून ओळखला जातो. आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर जवळपास गेली दोन दशकं तो सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. (Himesh Reshammiya birthday) आज हिमेशचा वाढदिवस आहे. 48 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आज हिमेश एक गायक म्हणून यशाच्या शिखरावर आहे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल खरं तर त्याला संगीत क्षेत्रात करिअर करायचंच नव्हतं. वडिलांच्या आग्रहाखातर त्याला गायक व्हावं लागलं. राज कुंद्राच्या अटकेवर शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली… हिमेश हा बॉलिवूडमधील नामांकित संगीतकार विपिन रेशमिया यांचा मुलगा आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्याच्यावर संगीताचे संस्कार झाले होते. परंतु त्याला संगीताऐवजी क्रिकेटमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. मात्र वडिलांच्या आग्रहाखातर त्याला क्रिकेट सोडून संगीत क्षेत्रात पाहूल ठेवावं लागलं. अर्थात वडिलांच्या सांगण्यावरून आलेला असला तरी देखील हिमेशला लहानपणापासूनच संगीताची जाण होती. त्याने शास्त्रीय संगीत आणि विविध वाद्यांचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं होतं. शिवाय शालेय संगीत स्पर्धांमध्येही तो बक्षिसं मिळवत होता. अन् याचा फायदा त्याला बॉलिवूडमध्ये झाला. 786 रुपयांची नोकरी करणारा तरुण कसा झाला सिंघम? पाहा सूर्याचा संघर्षमय प्रवास हिमेशने सलमान खानच्या प्यार किया तो डरना क्या या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये तो सहाय्यक संगीत दिग्दर्शक होता. त्यानंतर बंधन, हेलो ब्रदर, दुल्हन हम ले जाएंगे, कुरूक्षेत्र, क्या दिल ने कहा, जोडी नंबर वन यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी संगीत निर्मिती त्याने केली. तेरे नाम या चित्रपटातून तो खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. यामधील गाण्यांसाठी त्याला सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार देखील मिळाला होता. हिमेशच्या करिअरने खरी उंची गाठली ती आशिक बनाया आपने आणि अक्सर या चित्रपटांमुळे. या चित्रपटांमधील त्याची गाणी तुफान लोकप्रिय झाली होती. अन् त्याला बॉलिवूडमधील आघाडिच्या संगीतकारांच्या पंक्तित स्थान मिळालं होतं. अशा प्रकारे क्रिकेटची आवड असलेला हिमेश झाला एक यशस्वी संगीतकार.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Birthday celebration, Entertainment, Song

    पुढील बातम्या