रानू मंडलच्या Viral Video वर हिमेश रेशमियानं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

रानू मंडलच्या Viral Video वर हिमेश रेशमियानं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

एका चाहतीसोबत सेल्फी घेण्यास नकार दिल्यानं रानू मंडल सोशल मीडियावर खूप ट्रोल झाल्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी : लता मंगेशकर यांच्या ‘एक प्यार का नगमा है...’ या गाण्यामुळे रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल काही दिवसांपूर्वी एका व्हायरल व्हिडीओमुळे ट्रोलिंगची शिकार ठरल्या होत्या. या व्हिडीओमध्ये त्यांनी एका चाहतीसोबत सेल्फी घेण्यास नकार दिला होता तसेच तिच्यासोबत वाद घालताना दिसल्या होत्या. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका सुद्धा झाली होता. त्यांच्या या व्हिडीओवर आता रानू मंडल यांना गाण्याची संधी देणारा बॉलिवूड सिंगर हिमेश रेशमियानं पहिल्यांदाच त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

हिमेश रेशमिया सध्या Indian Idol 11 मध्ये जज म्हणून काम पाहत आहे. दरम्यान त्यानं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत हिमेश रेशमियानं रानू यांच्या व्हायरल व्हिडीओवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, जेव्हा मी रानू यांना ब्रेक दिला. त्यावेळी मी लताजींचा आवाज मिळावा अशी अपेक्षा करत होतो. जो ‘तेरी मेरी काहानी’ गाण्याच्या आलापमध्ये कॉन्टेपरेरी मॉर्डन गिटारसोबत जुळेल आणि हा आवाज रानू यांच्या रुपानं मला मिळाला. हे गाणं हिट झालं आणि त्या सुद्धा त्यासोबत सगळीकडे हिट झाल्या. त्यांच्या सेल्फी न देण्याच्या व्हायरल व्हिडीओबद्दल ऐकलं आहे. त्यावरुन त्यांना ट्रोल केलं गेलं हे सुद्धा मी ऐकलं आहे. पण त्या मागची कहाणी मला माहित नाही.

हिमेश म्हणाला, ‘मी या प्रकरणावर बोलण्यासाठी योग्य व्यक्ती नाही. रानू यांनी स्वतः याचं उत्तर द्यावं असं मला वाटतं. पण त्यांनी अजूनपर्यंत असं केलेलं नाही. त्यामुळे मी यावर काहीही बोलू शकत नाही.’

कतरिना कैफ अडकली लग्नाच्या बेडीत? नवरीच्या गेटअपमधील फोटो झाले VIRAL

 

View this post on Instagram

 

Social | Don't touch me; I'm celebrity now. #ranumondal #Kolkata #Bollywood #bollywoodfashion #bollywoodnews #bollywoodcelebrity #Mumbai #Filmcity #IndianHistoryLive

A post shared by Indian History Pictures (@indianhistorylive) on

रानू यांच्याबद्दल बोलतना हिमेश सांगतो, मला वाटतं जेव्हा तुम्हाला एवढी अटेंशन मिळतं. तेव्हा तुम्ही स्टार झालेले असता. लोकांचं खूप प्रेम तुम्हाला मिळालायला सुरुवात होते. तेव्हा तुम्ही यासाठी तयार असायला हवं. पण माझ्या मते, रानू जिथून आल्या आहेत. त्यावरुन त्या सगळ्यासाठी तयार आहेत की, नाही हे मलाही माहित नाही. पण त्या आता स्टार बनल्या आहेत.

'ही' अभिनेत्री करतेय स्वतःहून 15 वर्षांनी लहान मॉडलला डेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2020 12:21 PM IST

ताज्या बातम्या