रानू मंडलचं नाव ऐकताच भडकला हिमेश रेशमिया, म्हणाला...

रानू मंडलचं नाव ऐकताच भडकला हिमेश रेशमिया, म्हणाला...

एका इव्हेंटमध्ये असं काय झालं की रानू मंडल यांचं नाव ऐकल्यावर हिमेश रेशमिया भडकलेला दिसला.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : रानू मंडलला ओळखत नाही असं सध्या तरी कोणीच नाही. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वेस्टेशनवर गाणं गाउन स्वतःचं पोट भरणाऱ्या रानू मंडल एका व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर रातोरात स्टार झाल्या. लता मंगेशकर यांच्या ‘एक प्यार का नगमा है’ या गाण्यामुळे रानू मंडल इतक्या लोकप्रिय झाल्या की बॉलिवूड प्लेबॅक सिंगर हिमेश रेशमियानं त्यांना त्याच्या सिनेमात पहिला ब्रेक दिला. पण आता असं काही झालं की एका इव्हेंटमध्ये रानू मंडल यांचं नाव ऐकल्यावर हिमेश रेशमिया भडकलेला दिसला.

मुंबईतील एका इव्हेंटमध्ये हिमेश रेशमिया लाइव्ह परफॉर्मन्स देण्यासाठी पोहोचला होता. यावेळी तिथे असलेल्या काही पत्रकारांनी त्याला रानू मंडलशी संबंधीत प्रश्न केला. त्यावर हिमेश म्हणाला, मी त्यांच्या मॅनेजर नाही आहे. जे तुम्ही मला त्यांच्याबद्दल विचारत आहात. इंडस्ट्रीमध्ये ब्रेक मी फक्त रानू मंडललाच नाही तर इतरही अनेकांना दिला आहे. जसे की आर्यन, दर्शन, शैनन, पलक मुच्छल

बॉक्सऑफिसवर 2020मध्ये होणार मोठी टक्कर, या कलाकारांमध्ये रंगणार तगडी स्पर्धा

हिमेशनं रानू मंडल यांचं कौतुकही केलं. तुझ्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये रानू मंडलचा सहभाग असणार आहे का? यावर हिमेश म्हणाला, त्याचं गाणं खूप चांगलं आहे. त्यामुळे मी आणखी काही म्यूझिक डायरेक्टर्सना आणि प्रोड्युसर्सना रानू यांच्या नावाची शिफारस नक्की करेन. त्यांचा आवाज खूप चांगला आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात काम नक्कीच मिळेल.

HBD Thalaiva: कधी बस कंडक्टरची नोकरी करणारा अभिनेता आज आहे 'साउथचा देव'

याशिवाय हिमेशनं रानू मंडल यांच्यावर होणाऱ्या ट्रोलिंगवरही प्रतिक्रिया दिली. हिमेश म्हणाला, मागच्या बऱ्याच काळापासून मला कोणाही ट्रोल केलेलं नाही. रानूंच्या सेल्फीवाल्या व्हिडीओवरुन झालेल्या ट्रोलिंगबद्दल मी ऐकलं होतं मात्र मला त्यावर आता मला काहीही बोलायचं नाही. हे सर्व तुम्ही मला विचारण्यापेक्षा रानू मंडल यांनाच जाऊन विचारा.

 

View this post on Instagram

 

#welcome @ranumondal.offical #asianet #asianetnews #love #support #india#comedystars

A post shared by Ranu Mondal⏺️ (@ranumondal.offical) on

हिमेश रानू मंडल यांच्या त्या व्हायरल व्हिडीओबद्दल बोलत होता. ज्यात एक महिला रानू मंडल यांच्याकडे सेल्फी मागत होती मात्र तिला सेल्फी न देता रानू त्या महिलेवर रागावलेल्या दिसल्या. त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता आणि त्यामुळे रानू मंडल यांच्यावर खूप टीका करण्यात आली होती.

परदेशी क्रिकेटपटूनं अभिनेत्रीला केलं प्रपोज, IPL सारखा असणार लग्नाचा थाट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2019 12:26 PM IST

ताज्या बातम्या