मुंबई, 3 नोव्हेंबर- टीव्ही (Tv) आणि बॉलिवूड (Bollywood) अभिनेता हिमांशू कोहली (Himansh Kohali Birthday) आपल्या क्युट लूकसाठी ओळखला जातो. अनेक तरुण त्याच्यावर फिदा आहेत. हा लाडका अभिनेता आज आपला ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने त्याच्या काही खास गोष्टीं एक नजर टाकूया.
View this post on Instagram
३ नोव्हेंबर १९८९ रोजी दिल्लीत जन्मलेला अभिनेता हिमांश कोहली लहानपणापासून राजेश खन्नाचा मोठा चाहता होता. हिमांशला त्यांचे चित्रपट फार आवडतात. राजेश खन्ना यांना तो आपला आदर्श मानतो. हिमांशचं शिक्षण दिल्लीतच पूर झालं. रेडिओ जॉकी म्हणून त्यानं आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण त्यांचं मन अभिनयात गुंतलं होतं. त्यामुळे त्यानं अवघ्या तीन महिन्यात आरजेची नोकरी सोडून दिली होती.
View this post on Instagram
2011 मध्ये हिमांश कोहलीने 'हम से है लाइफ' या व्ही चॅनेलवरील शोमधून अभिनयाचा प्रवास सुरू केला होता. यातील त्याच्या पात्राचे नाव होते राघव ओबेरॉय. या शोला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. खासकरून हा शो कॉलेज तरुणांमध्ये जास्त फेमस झाला होता. दोन मित्र एक साधा,समजूतदार तर दुसरा रागीट, पैसेवाला, बॉक्सर मात्र मनातून तितकाच हळवा आणि या दोघांच्या लाईफमध्ये एकच अभिनेत्री अशी या शोची स्टोरी होती. दरम्यानच त्याला 'यारियां' हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांनी केले होते. हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. सर्वांनाच हिमांशचे काम आवडले. चित्रपटातील गाणी खूप गाजली होती. यातील एक गाणं - 'आज ब्लू है पानी...पानी...पानी' गायिका नेहा कक्करने रॅपर हनी सिंगसोबत गायले होते. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटातून हिमांश आणि नेहा एकमेकांच्या जवळ आले.
हिमांश कोहलीच्या आयुष्यात नेहा कक्करची एन्ट्री झाली होती. या दोघांनी सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. एक-दोन नव्हे तर अनेकवेळा त्यांनी मीडियासमोर आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. त्यांची जोडी सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनली होती. हे दोघेही सतत एकेमकांसोबत वेळ घालवताना दिसून येत होते. एका कार्यक्रमामध्ये हिमांशने चक्क गुडघ्यावर बसून आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. या दोघांनी मिळून एक व्हिडीओ ऍल्बमदेखील काढलं होतं. यामध्ये दोघांनीच अभिनय केला होता. हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं होतं. मात्र काही दिवसांनी यांच्यामध्ये सर्वकाही बिघडलं. आणि काही वेळेनंतर दोघांनी ब्रेकअप झाल्याचं कबूल केलं. मात्र अनेक शोमध्ये नेहाने आपलं दुःख व्यक्त केलं होतं. तिला या गोष्टीचा मोठा धक्का बसला होता. एका शोदरम्यान नेहाला चक्क रडू कोसळलं होतं. मात्र आता दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.
(हे वाचा:HBD: फक्त मॅरिडच नव्हे तर एका मुलाची आई आहे सौम्या टंडन; 'भाभी जी....'मधून....)
दरम्यान, 2017 मध्ये हिमांशचे स्वीटी वेड्स एनआरआय, रांची एक्सप्रेस आणि दिल जो न कह सके हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. पण तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. 2018 मध्ये त्यांचा आणखी एक चित्रपट अभी नही तो कभी नही प्रदर्शित झाला परंतु हा चित्रपट देखील चालला नाही. चित्रपटांव्यतिरिक्त हिमांश कोहलीने अनेक म्युझिक व्हिडिओ देखील केले आहेत. या वर्षात आतापर्यंत हिमांश पाच म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसला आहे आणि ते सर्व टी-सिरीज अल्बम आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment