Home /News /entertainment /

Ketki Chitale : केतकी चितळेला मोठा दिलासा! शरद पवार आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी कोणतीही कडक कारवाई न करण्याचे HCचे आदेश

Ketki Chitale : केतकी चितळेला मोठा दिलासा! शरद पवार आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी कोणतीही कडक कारवाई न करण्याचे HCचे आदेश

 Ketki Chitale : केतकी चितळेला मोठा दिलासा! शरद पवार आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी कोणतीही कडक कारवाई न करण्याचे HCचे आदेश

Ketki Chitale : केतकी चितळेला मोठा दिलासा! शरद पवार आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी कोणतीही कडक कारवाई न करण्याचे HCचे आदेश

केतकीच्या अडचणी कमी झाल्याचं पहायला मिळतंय. केतकीवरची अटकेची टांगती तलवार दूर झाली आहे.

    मुंबई, 27 जून : मराठी अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketki chitale latest news)राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar)यांच्याविषयी आक्षेपार्ह भाष्य केलं होतं. याप्रकरणानं राज्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघालं होतं. राजकीय वातावरणही जोरदार पेटलं होतं. केतकीच्या या वक्तव्याची दखल घेत तिला तुरुंगातही जावं लागलं. अॅट्रोसिटी अंतर्गत केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यत घेतलं होतं. नुकतंच काही दिवसांपूर्वी केतकीची सुटका करण्यात आली. अशातच केतकीविषयी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केतकीनं (Ketaki Chitale has been granted interim relief) शरद पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविषयी 21 प्रलंबित एफआयआरमध्ये केतकी चितळेला (Consolation of ketki chitale) महाराष्ट्र पोलिसांनी अंतरिम दिलासा दिला आहे. केतकी चितळेला अंतरिम दिलासा मिळाला असून केतकीवर कुठल्याही प्रकारची कारवाई करु नये, असे आदेश उच्च न्यायालयानं पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे केतकीच्या अडचणी कमी झाल्याचं पहायला मिळतंय. केतकीवरची अटकेची टांगती तलवार आता गेली आहे. हेही वाचा - लेकीच्या वाढदिवसाला सिद्धार्थ तृप्ती एकत्र! दोन वर्षांनी शेअर केलाय बायकोबरोबरचा PHOTO केतकी चितळेनं फेसबुकवर (Ketki chitale controversial facebook post) एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये केतकीनं राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त मजकूर लिहिला होता. तिची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी प्रचंड आक्रमक झाली होती. अनेक ठिकाणी तिच्यावर तक्रारी दाखल केल्या होत्या. केतकीवर टिकेची झोड उठली होती. याशिवाय तिच्यावर शाईफेकही करण्यात आली. केतकीला 14 मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 18 मे पासून केतकी न्यायालयीन कोठडीत होती.  22  जूनला केतकीला जामून मंजूर झाला आणि 23जून ला तिची सुटका करण्यात आली. अशातच उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर 21 गुन्हे असूनही केतकीला अटक करु शकत नाही. केतकी चितळे याआधीही तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हा आणि तक्रारी दाखल होण्याची ही पहिलीच वेळ होती. आधी शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे आणि त्यानंतर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं केतकीला अनेक दिवस कोठडीत काढावे लागले. परंतू आता दोन्ही प्रकरणात केतकीला जामीन मंजूर झाला आहे. केतकी चितळेला अभिनेत्री म्हणून जास्त नाव कमवता आलं नाही. मात्र ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेहमीच कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरुन ती चर्चेत असते. केतकी नेहमीच सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य करताना पहायला मिळते. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असते.
    Published by:Sayali Zarad
    First published:

    Tags: Marathi actress, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या