कोरोनाला हरवल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सांगितली ऑक्सिजन पातळी वाढवण्याची ट्रीक!

कोरोनाला हरवल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सांगितली ऑक्सिजन पातळी वाढवण्याची ट्रीक!

अमिताभ बच्चन यांनी कोरोनाला हरवल्यानंतर लगेचच 'केबीसी'ला सुरुवात झाली. दरम्यान या कार्यक्रमामध्ये ते अनेकदा 'कोरोना' काळातील किस्से शेअर करतात.

  • Share this:

मुंबई, 04 ऑक्टोबर: कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) करत आहेत. सप्टेंबरमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला असून, प्रेक्षक या शोचा विशेष आनंद घेत आहेत. काही जण तर केवळ बच्चन यांच्या सूत्रसंचालनासाठी हा कार्यक्रम पाहत आहेत. त्याचबरोबर आपल्या उत्तम सूत्रसंचालनाने आणि गमतीदार स्वभावाने या कार्यक्रमाची ते चांगलीच रंगत वाढवतात.

या कार्यक्रमातील स्पर्धकांची चिंता कमी करण्यासाठी आणि त्यांना हलकं वाटवं म्हणून अमिताभ बच्चन त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील संवाद साधतात. त्यांच्या कामाविषयी जाणून घेण्याचा देखील प्रयत्न करतात. एका एपिसोडमध्ये अपर्णा व्यास या फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राउंड जिंकून हॉट सीटवर बसल्या. अपर्णा यांना बोलताना अडथळा येत असल्याने त्यांच्याबरोबर त्यांचे वडील होते.

सोमवारच्या एपिसोडच्या शेवटी बच्चन यांनी अपर्णा यांना तुम्ही तुमची ऑक्सिजन पातळी चेक केली आहे का? असं विचारलं. यावर त्यांनी आपण ऑक्सिमीटरने आपली ऑक्सिजन पातळी तपासली असून ती 95-96 इतकी आली होती असं सांगितलं. यावेळी बच्चन यांनी ऑक्सिजन पातळी वाढवण्याची एक नवीन ट्रिक संगितली. या वेळी त्यांनी त्याचा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरचा किस्सा शेअर केला.

(हे वाचा-कंगनाला मुंबई पोलिसांची दुसरी नोटीस, आता चौकशीला हजर न राहिल्यास अडचणी वाढणार)

त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आल्यानंत दर 2 तासांनी त्यांची ऑक्सिजनची पातळी तपासली गेली असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं. अमिताभ बच्चन म्हणाले की, सुरुवातीला त्यांची ऑक्सिजन पातळी तपासली असता ती 92-93 आढळून आली. त्यावेळी डॉक्टरांनी ऑक्सजन पातळी  हळूहळू 98 पर्यंत वाढेल असं सांगितलं.

(हे वाचा-कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनशीपमध्ये?अक्षयने असा केला खुलासा)

यावेळी त्यांनी ऑक्सिजनची पातळी वाढवण्याची ट्रिक सांगितली की, ज्यावेळी नर्स त्यांची ऑक्सिजन पातळी तपासायला यायची त्यावेळी ते मोठा श्वास घेत असंत. त्यामुळे या मीटरमध्ये ही पातळी 98 दिसत असे. जर ही पातळी  92-93 आढळून आली तर ते गोळ्या देत असतं. त्यामुळे मी हळूहळू जोरजोरात श्वास घेऊन मी ऑक्सिजनची पातळी वाढवत असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर अपर्णा देखील खळखळून हसल्या.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 4, 2020, 8:30 AM IST

ताज्या बातम्या