मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Hemand Dhome : 'प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?', सिनेमागृहात हाऊसफुल्लची पाटी पाहून हेमंतनं विचारला प्रश्न

Hemand Dhome : 'प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?', सिनेमागृहात हाऊसफुल्लची पाटी पाहून हेमंतनं विचारला प्रश्न

हेमंत ढोमे

हेमंत ढोमे

'म्हणजे तिकीट दर कमी असतील तर...'; हमेंत ढोमेनं विचारेल्या प्रश्नाची सध्या चर्चा होतेय.

  • Published by:  Minal Gurav
मुंबई,  23 सप्टेंबर :   सिनेसृष्टीसाठी आज खास दिवस आहे. आज देशभरात राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा होत आहे. याच दिवसाचं औचित्य साधून प्रेक्षकांना कमीत कमी खर्चात सिनेमा पाहण्याची संधी दिली आहे.  आजच्या दिवशी सिनेमागृहात केवळ 75 रुपयांमध्ये प्रेक्षकांना सिनेमा पाहायला मिळत आहे. या स्पेशल ऑफरमुळे तमाम प्रेक्षकांनी सिनेमागृहाची वाट धरली  आणि संपूर्ण सिनेमागृह हाऊसफुल्ल केलं. या संकल्पनेमुळे सिनेमागृहातील हाऊसफुल्लची पाटी पाहून अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी ट्विटद्वारे आपलं मतं मांडत प्रश्न उपस्थित केला आहे. अभिनेता हेमंत ढोमे सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. त्याची मतं तो याद्वारे मांडत असतो. सध्या 'बॉइज 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सिनेमा चांगली कमाई करतोय. 75 रुपयांचं तिकीट काढून आज प्रेक्षकांनी बॉइज 3 पाहण्यासाठी गर्दी केली आहे.  बॉइज 3 सिनेमाच्या बुकींगचा एक स्क्रिनर्ट शेअर करत हेमंतनं पोस्ट लिहिली आहे. 'आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी ७५ रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्या नंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केलीय! सगळीकडे मराठी चित्रपट हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात? प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?', असा प्रश्न हेमंतनं विचारला आहे. हेही वाचा - Hemant Dhome: 'आता बरोबर एक वर्षाने...'; हेमंत ढोमेनं शेअर केली खास POST आपण पाहिलं तर अनेकवेळा बॉलिवूड सिनेमांच्या तिकीटी फार महाग असतात अशी तक्रार केली जाते मात्र तरीही प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करतात. तर दुसरीकडे मराठी सिनेमांच्या तिकीटीची किंमत त्यामानाने बरीच कमी असूनही प्रेक्षक मराठी सिनेमाकडे पाठ फिरवतात.  त्यातही झिम्मा, पावनखिंड, शेर शिवराज है, अनन्या, टाइमपास 3 सारख्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
मागचे दोन वर्ष कोरोना आणि लॉकडाऊनचा सिनेसृष्टीला मोठा फटका बसला. त्यातही मराठी सिनेसृष्टीत चांगलीच होरपळून निघाली. दुसरीकडे मराठी सिनेमांचा प्राइम टाइम न मिळणं ही मोठी समस्या आहे. बॉलिवूड बायकॉटचा काहीशा झळा या मराठी सिनेमांना देखील सहन कराव्या लागल्या. पण आज राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त राबवलेल्या या संकल्पनेमुळे सध्या सिनेमागृहात सुरू असलेल्या अनेक मराठी सिनेमांना फायदा झाला आहे. अभिनेता हेमंत ढोमेचा 'झिम्मा' हा सिनेमा कोरोना काळानंतर रिलीज झालेला पहिला मराठी सिनेमा होता. या सिनेमानं देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तब्बल 50 दिवस सिनेमा सिनेमागृहात सुरू होता.
First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

पुढील बातम्या