मुंबई, 19 मार्च- : मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून ओळखला जाणारा हेमंत ढोमे सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो नेहमीच काहीना काहीना अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकतीच हेमंतनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टवर त्याची बायको अभिनेत्री क्षिती जोगनं कमेंट केली आहे. हेमंतच्या पोस्टपेक्षा क्षितीच्या कमेंटची चर्चा सोशल मीडियावर जास्त रंगलेली दिसत आहे.
हेमंत ढोमेने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने पांढऱ्या रंगाचं शर्ट परिधान केलेला दिसत आहे. चष्मा लावून हेमंतने फोटोसाठी एक खास पोझ देखील दिली आहे. हेमंतने या फोटोला एक भन्नाट कॅप्शनही देखील दिली आहे. हेमंतनं म्हटलं आहे की, “वाघ तर आपण लहानपणापासून होतोच! शिकार आत्ता आत्ताच करायला लागलोय…” पण त्याच्या पोस्ट पेक्षा त्याच्या बायकोने म्हणजेच अभिनेत्री क्षिती जोगने यावर भन्नाट कमेंट करत त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.
वाचा-हे 5 सस्पेन्स थ्रिलर चित्रपट उडवतील थरकाप; स्क्रीनवरुन हटणार नाही नजर
हेमंतच्या या फोटोवर त्याची पत्नी क्षिती म्हणाली आहे, ''कसली शिकार? पालीची? कारण तेवढंच शक्य आहे आता..'' हेमंतच्या पोस्टवरील क्षितीची ही कमेंट पाहून चाहत्यांना हसू अनावर झालं आहे. क्षितीनं एका कमेंटनं हेमंतची हवा मात्र टाईटच केली आहे.
View this post on Instagram
एका चाहत्यानं असं सगळं वातावरण तापलं असताना भन्नाट कमेंट केली आहे. त्यानं म्हटलं आहे की,हळूच बोला वैनी ऐकतील 😂 मांजर व्ह्यायाला येळ नाही लागणार 😂 तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,Captain 😂😂😂 जोग बाईंची शिकार केलीच की असो पण हा रागावला लूक का म्हणून..तर आणखी एकानं अशीच मजेशीर कमेंट करत म्हटलं आहे की,वाघ आहात तुम्ही पाटील🐯., वाघाला शिकार करायला शिकवायची गरज नसते🎯🔥❤️अशा असंख्य कमेंट हेमंतच्या या पोस्टवर आल्या आहेत.
‘सावधान शुभमंगल’ या नाटकात क्षिती आणि हेमंत या दोघांनी एकत्र काम केलं होतं. हे त्यांनी एकत्र केलेलं पहिलं काम. त्या नाटकाच्या वेळी त्यांचे सूर जुळले आणि दोघांनी लग्न केलं. या दोघांचा सध्या सुखाचा संसार सुरू आहे. नुकताच हेमंतचा 'सातारच सलमान' चित्रपट आपल्या भेटीस आला होता. लवकरच त्याचा 'झिम्मा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते देखील त्याच्या नवीन प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.