‘तिथं स्मशान होईल वाटलं नव्हतं’; हेमंत ढोमेची पोस्ट पाहून तुम्ही देखील व्हाल भावुक

‘तिथं स्मशान होईल वाटलं नव्हतं’; हेमंत ढोमेची पोस्ट पाहून तुम्ही देखील व्हाल भावुक

"बाग म्हणजे… खेळायची जागा…आजी आजोबांनी आपल्याला फिरायला नेऊन गोष्टी सांगायची… चिऊताई… खारूताई बघायची जागा…"

  • Share this:

मुंबई 30 एप्रिल: कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. यामुळं लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. हजारो लोक कोरोनामुळं मृत्युमुखी पडले आहेत. शिवाय ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधं, लसी यांचा अभाव निर्माण झाल्यामुळं अनेक रुग्ण मृत्यूच्या दारात उभे आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे वाढत्या मृत्युदरामुळं मृतदेहांची विल्हेवाट लावायची कशी हा एक मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. अन् याच प्रश्नाचं उत्तर म्हणून दिल्लीतील एका बागेचं स्मशानभूमीत रुपांतर करण्यात आलं. अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) यानं एका पोस्टद्वारे ही महत्वाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. या पोस्टद्वारे त्यानं सद्य परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

“बाग म्हणजे… खेळायची जागा…आजी आजोबांनी आपल्याला फिरायला नेऊन गोष्टी सांगायची… चिऊताई… खारूताई बघायची जागा… साळुंखीची जोडी शोधायची जागा… तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं… पण आपण सारे मिळुन या राक्षसाला हरवु! पुन्हा बागडायला आपल्या फुलांच्या बागा मिळवू!” अशा शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘फुकटचे सल्ले थांबव अन् स्वत: मदत कर’; देवोलीनानं कंगना रणौतला सुनावले खडेबोल

‘लहान स्तनांमुळं चित्रपटातून केलं होतं बाहेर’; वंडर वुमननं सांगितला धक्कादायक अनुभव

भारतात रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या 24 तासांत 3 लाख 60 हजार 960 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

Published by: Mandar Gurav
First published: April 30, 2021, 12:36 PM IST

ताज्या बातम्या