मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘इथं आमी पन काय कमी नाय!’; हेमांगीचं अनुष्का आणि दीपिकाला आव्हान

‘इथं आमी पन काय कमी नाय!’; हेमांगीचं अनुष्का आणि दीपिकाला आव्हान

तिथं दीपवीर आणि अनुष्का रोमँटिक फोटो काढतायेत... पण आम्ही सुद्धा कमी नाही... मराठमोळ्या अभिनेत्रीनं दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्माला दिलं आव्हान

तिथं दीपवीर आणि अनुष्का रोमँटिक फोटो काढतायेत... पण आम्ही सुद्धा कमी नाही... मराठमोळ्या अभिनेत्रीनं दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्माला दिलं आव्हान

तिथं दीपवीर आणि अनुष्का रोमँटिक फोटो काढतायेत... पण आम्ही सुद्धा कमी नाही... मराठमोळ्या अभिनेत्रीनं दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्माला दिलं आव्हान

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 27 मे: ‘फु बाई फु’ या विनोदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली हेमांगी कवी (Hemangi Kavi) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. हेमांगी गेल्या काही काळात आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील चर्चेत राहू लागली आहे. तिनं शेअर केलेल्या पोस्ट, फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. यावेळी देखील तिनं अशीच एक मिष्किस पोस्ट शेअर केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या पोस्टद्वारे तिनं थेट अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांना जणू आव्हानच दिलं आहे.

“तिथं दिपविर, विरुषका क्वारंटाईन काळात लय रोमांचिक सेल्फ्या पोष्टीत हायेत, मंग म्हणलं इथं आमी पन काय कमी नाय! इस बंद कमरे में पतीदेव का कॅमेरा....हे ते कमरा... हे आपलं ते कमर दबा रहें हैं हम! तो फिर क्या गम, तो फिर क्या गम!” अशी गंमतीशीर पोस्ट तिनं शेअर केली आहे. सोबतच आपल्या पतीची सेवा करतानाचे काही फोटो देखील तिनं शेअर केले आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. साधी राहणी उच्च विचार सरणी अशा गंमतीशीर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंचं कौतुक केलं आहे.

यापूर्वी देखील तिनं अशीच एक गंमतीशीर पोस्ट करुन आपल्या शूटिंगचा अनुभव सांगितला होता. ती म्हणाली, “सततचं shooting गेल्या June July पासून. October मध्ये आराम मिळाला होता तसा...पण पुन्हा जोमानं सुरू झालं! कपाट लावायचं राहिलं होतं, आता वेळच वेळ आहे उद्यापासून! घर वर वर साफ होत होतं रोज, Deep cleaning उद्यापासून! Shooting च्या धावपळीत शारिरीक व्यायाम राहिला होता, तोही उद्यापासून! फक्त ते cake आणि कसली ती coffee काही झालं तरी, ते नाही उद्यापासून, कधीच नाही! हा lockdown फक्त 15 दिवसाचाच असावा अशी आपण सर्वजण मनापासून प्रार्थना करूयात! Lockdown हा शब्दच किती नकारात्मक आहे. पण सकारात्मक दृष्टीने Break the Chain म्हणून हा lockdown योग्य असेल ही पण तो वाढायला नको! घाबरायचं नाही, खचून जायचं नाही! अनेक संकटं पाहिली, सोसली, हे ही पार करूच! काळजी घ्या, खबरदारी घ्या! हसा, हसवत रहा!”

First published:

Tags: Anushka sharma, Deepika padukone, Marathi actress