• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अभिनेत्री हेमांगी कवी नवऱ्यापासून लपूनछपून करते नको ते काम! सोशल मीडियावर स्वतःच केला मोठा खुलासा

अभिनेत्री हेमांगी कवी नवऱ्यापासून लपूनछपून करते नको ते काम! सोशल मीडियावर स्वतःच केला मोठा खुलासा

हेमांगी कवी (Hemangi Kavi ) तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 02 ऑक्टोबर : बेधडक वक्तव्य आणि बिनधास्त वागणं यामुळे मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. हेमांगी तिचे काही फोटो व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकदा या फोटो आणि व्हिडिओमुळे ती सोशल मीडियावर ट्रोल देखील झाली आहे. मागील काही दिवासात 'बाई, बुब्स आणि ब्रा' या  (Hemangi Kavi Latest Post ) पोस्टमुळे चर्चेत आली होती. आता देखील हेमांगी एका पोस्टमुळे चांगलीत चर्चेत आली आहे. हेमांगीने तिच्या इन्स्टावर तिचे काही टी शर्ट आणि जीन्सच्या शॉर्टमधील फोटो शेअर केले आहे. या कपड्यात तिने विविध पोझ देताना दिसत आहे. तिने या फोटोला एक कॅप्शन दिली आहे. या कॅप्शनमधून तिने मोठा खुलासा केला आहे. नवऱ्यापासून लपूनछपून ती एक भलतंच काम करते. सोशल मीडियावर स्वतःत तिने याचा उलगडा केला आहे.
  आता हेमांगीची राज की बात काय तर या फोटोत तिने जे कपडे घातले आहे ते तिचे नाहीत तर चोरीचे आहेत. हेमांगीने आपल्या नवऱ्याचे कपडे चोरी करून घातले आहेत. हे वाचा - ही मराठमोळी अभिनेत्री करतेय लग्न; सोशल मीडियावर चाहत्यांना दिली आनंदाची बातमी हेमांगीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. महिन्यातून एकदा तरी नवऱ्याचे कपडे ढापायचे हे ठरलंय आपलं! . यावर चाहत्यांनी देखील तिला लगेच कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी तिला चोर म्हटल आहे तरी कुणी सई बात, कधीपासून असं करतेस अशा काही मजेदार कमेंट केल्या आहेत. चाहत्यांना हेमांगीची नवऱ्याची कपडे ढापण्याची कल्पना भलतीच आवडलेली आहे. 'बाई, बुब्स आणि ब्रा' या पोस्टमुळे आली होती चर्चेत मागच्या काही दिवसापूर्वी हेमांगी कवीची एक फेसबुक पोस्ट जोरदार व्हायरल झाली होती. या पोस्टमुळं ती गुगल ट्रेडिंगमध्ये आली होती. महिलांनी ब्रा वापरण्यासंदर्भात तिनं एक पोस्ट फेसबुकवर लिहिली होती. यानंतर या विषयावर जोरदार चर्चा सुरु झाली. किती तरी मुलींना ब्रा वापरल्याने अस्वस्थ वाटत राहतं, त्यांची इच्छा नसताना ही 'लोग क्या कहेंगे' या साठी घट्ट ब्रा वापरून स्वतःवर अन्याय करत राहतात, असं हेमांगीनं म्हटल होते.  हे वाचा -  आली लग्नघटिका समीप! सुयश टिळक, आयुषी भावेचा केळवण समारंभ; पाहा PHOTO बाईने तिचे बुब्स (स्तन), त्याला असलेली पुरुषांसारखीच स्तनाग्रे आणि त्यांना धरून ठेवायला, झाकायला किंवा मला आवडत नाही पण लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो! मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही! ..अशा शब्दात हेमांगीने तिचे मत मांडले होते. तिच्या यो पोस्टवर सर्वसामन्या जनता ते अनेक मोठमोठ्या कलाकारांनी देखील प्रतिक्रिया देत तिला पाठिंबा दिला होता.
  Published by:News18 Trending Desk
  First published: