Home /News /entertainment /

Cannes 22: हेमांगी कवीची कानच्या रेड कार्पेटसाठीची तयारी पाहिली का? विचित्र VIDEO पाहून तुम्हीही द्याल टाळी

Cannes 22: हेमांगी कवीची कानच्या रेड कार्पेटसाठीची तयारी पाहिली का? विचित्र VIDEO पाहून तुम्हीही द्याल टाळी

नुकतात हेमांगीनं तिचा एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

  मुंबई, 21 मे- अभिनेत्री हेमांगी कवी ( Hemangi Kavi) सोशल मीडियार प्रचंड सक्रीय असते. हेमांगी विविध विषयावर सोशल मीडियावर व्यक्त होत असते. समाजातील विविध मुद्दयावर हेमांगी स्पष्टपणे मत मांडताना दिसते. नेहमीच ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. याशिवाय ती काही तिचे भन्नाट व्हिडिओ शेअर करत असते, त्यामुळे ती चर्चेत असते. नुकतात हेमांगीनं तिचा एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. सध्या सगळीकडं कान फिल्म फेस्टिवलची(cannes 2022) चर्चा आहे. बॉलिवूडच्या अनेक तारका या फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या लुकनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फेस्टिवलचा संबंध जोडत हेमांगीनं एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की पोट धरून हासाल हे खरं आहे. हेमांगीने तिच्या इन्स्टाला हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हेमांगी हातात आरसा आणि काजळ घेऊन उभी आहे. अत्यंत विचित्र पद्धतीने तिने डोळ्याला काजळ रेखाटले आहे. शिवाय ती आपल्या हावभावाने हे किती विद्रुप असल्याचेही दाखवून देतं आहे. या व्हिडिओला तिनं एक भन्नाट टॅगलाईन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, 'जेव्हा चांगला मेकअप आर्टिस्ट परवडत नाही..' वाचा-संजनाला स्वयंपाक येत नाही पण रूपालीला येतो, विश्वास नसेल तर हा VIDEO पाहा याशिवाय हा व्हिडिओ शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, 'कान फिल्म फेस्टिवलमध्ये जाण्यासाठी मी तयारी करीत आहे.' हेमांगीच्या या विचित्र रूपाचा कान फेस्टिवलशी संबंध जोडण्यामागे देखील खास कारण आहे. या व्हिडिओमध्ये हेमांगीने एका हॉलीवूड अभिनेत्रीचाही व्हिडीओ जोडला आहे. ज्यामध्ये तिने या फेस्टिवलला असा लुक केला होता.
  कान फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) हिनेही असा मेकअप केल्याने तिला ट्रोल केले गेले. या सगळ्यावरून हेमांगीनं हा भन्नाट व्हिडिओ केला आहे. चाहत्यांनी देखील जमलं हे...असं म्हणत तिच्या या लुकचं कौतुक करत स्माईलीच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या