"हा बलात्काराएवढाच मोठा गुन्हा", प्रियांका गांधींचा फोटो पाहून भडकली हेमांगी कवी

प्रियांका गांधींचा (priyanka gandhi) हा फोटो पाहिल्यानंतर अभिनेत्री हेमांगी कवीला (hemangi kavi) आपला राग अनावर झाला. तिने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 04 ऑक्टोबर : दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर उत्तर प्रदेशातील सामूहिक बलात्कारामुळे पुन्हा एकदा देश हादरला. हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या (hathras gangrape) घटनेचे देशभर पडसाद उमटले. संपूर्ण देशाने संताप व्यक्त केला आहे. अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान पीडितेच्या कुटुंबासाठी भेट घेण्यासाठी गेलेल्या प्रियांका गांधींचा (priyanka gandhi) गर्दीतील एक फोटो पाहून आता अभिनेत्री हेमांगी कवी (hemangi kavi) भडकली आहे.

प्रियांका गांधींचा हाथरसमधील फोटो पाहिल्यानंतर अभिनेत्री हेमांगी कवीने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. प्रियांका गांधींचा फोटो शेअर करत तिने हा बलात्काराएवढाच मोठा गुन्हा असल्याचं म्हटलं आहे.

या फोटोमध्ये एक पोलीस अधिकारी प्रियांका गांधी यांचा हात पकडताना दिसत आहे. त्यावर हेमांगी कवी व्यक्त झाली आहे. फेसबुकवर पोस्ट करत हेमांगी म्हणाली, "नुसतं सोशल मीडियावर येऊन बोलू नका मॅडम. बाहेर पडा म्हणणाऱ्यांनो, चॅलेंज करणाऱ्यांनो हे पाहा. आहे का सुरक्षित? कसे वाटत आहेत ते हात तिच्यावर? हा ही बलात्काराएवढाच मोठा गुन्हा आहे. मूळ समस्या कुठे आहे कळतं आहे का?", असा सवाल हेमांगीने या पोस्टमधून केला.

"आता यात ही, हा कुणाचा फोटो? प्रियंका गांधी की जियंका गांधी, कुठल्या पक्षाची, आताच कशी बाहेर आली? यात गुंतवून मूळ समस्या बाजूला ठेवूया. काय?", अशी उपरोधिक टीकाही हेमांगीने केली आहे.

हे वाचा - UP पोलिसांप्रमाणे महाराष्ट्र पोलीसही दडपशाही करत आहेत, गंभीर आरोप

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबीयांची शनिवारी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. हाथरस प्रकरणातील पीडितेच्या आईने प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर डोकं ठेवून आपलं दु:ख व्यक्त केलं. यावेळी त्या ढसाढसा रडल्या.

हाथरस येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारवर यावरून सर्वस्तरातून टीका होत असताना आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस येथील घटनेची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हे वाचा - प्रियांका गांधींच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडली हाथरस पीडितेची आई; पाहा VIDEO

दरम्यान याआधी अभिनेत्री स्वरा भास्करने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. "योगींनी राजीनामा देण्याची वेळ आली आहे. त्यांच्या शासन काळात उत्तर प्रदेशात काय कायद्याचे सर्रास उल्लंघन केलं जात आहे. त्यांच्या पॉलीसींमध्ये जातीसंबंधित वाद घडवून आणला, खोटे एनकाऊंटर, गँगवॉर झाले आणि उत्तर प्रदेशात बलात्काराची महासाथ पसरली आहे. हाथरस केस केवळ एक उदाहरण आहे", असं ट्वीट तिनं केलं होतं.

Published by: Priya Lad
First published: October 4, 2020, 8:21 PM IST

ताज्या बातम्या