Home /News /entertainment /

पुरुषांच्या अस्वच्छतेवरून हेमांगी कवीची खरमरीत पोस्ट, वेस्टर्न टॉयलेट वापरण्यावरून केली टीका

पुरुषांच्या अस्वच्छतेवरून हेमांगी कवीची खरमरीत पोस्ट, वेस्टर्न टॉयलेट वापरण्यावरून केली टीका

अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये असणाऱ्या अस्वच्छतेबाबत तिने भाष्य केले आहे.

    मुंबई, 11 ऑगस्ट : अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये असणाऱ्या अस्वच्छतेबाबत तिने भाष्य केले आहे. यामुळे स्त्रियांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या तिने या पोस्टमधून मांडल्या आहेत. दरम्यान या पोस्टमधून तिने पुरुषांच्या पाश्चिमात्य शौचालय (Western Toilet) वापरण्याच्या पद्धतीवर खरमरीत टीका केली आहे. स्वच्छतेचे भान राखण्याचा सल्ला देखील तिने या पोस्टमधून दिला आहे. हेमांगीने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी western toilets (commode) असतात. त्यात काही common toilets म्हणजे स्त्री- पुरुषांकरता एकच toilet असतं. अश्यावेळी ते toilet कसं वापरावं याचं ज्ञान हे शाळेत किंवा घरातच पालकांनी लहानवयात आपल्या मुलामुलींना द्यायला हवं. अत्यंत गरजेचा विषय आहे समजून!' (हे वाचा-स्वरा भास्करने दिला रिया चक्रवर्तीला पाठिंबा, अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या) या पोस्टमध्ये हेमांगीने स्वच्छता, अशावेळी स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी सामोरे जावे लागणाऱ्या समस्या यावर भाष्य केले आहे. तिने या पोस्टमधून अशी टीका केली आहे की, 'स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अश्या घाणेरड्या commode वर त्या कशा बसत असतील? बसत नसतील तर मग कशा manage करत असतील? त्यांचा हा मूलभूत नैसर्गिक हक्क बजावताना काय द्राविडी प्राणायाम करत असतील याचा विचार होत नाही का? मासिक पाळी ( #periods, menustral cycle) च्या वेळी काय करत असतील याचा विचार होत नाही का? होत नसेल तर करावा. स्त्री पुरुष दोघांनी! #Commode कसं वापरावं हे कळत, माहीत नसेल तर न लाजता विचारावं, शिकून घ्यावं! कारण त्याचा थेट संबंध दोघांच्या ही hygiene, health शी असतो! सगळ्यांनी या विषयी openly बोलावं!' (हे वाचा-‘देवी तिथं जागृत आहे’; केदार शिंदेंनी व्यक्त केली न्यूझीलँडला जाण्याची इच्छा) या विषयावर खुलेपणाने बोलण्याचा सल्ला हेमांगीने दिला आहे. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता याबाबत अनेक जणांकडून मते मांडण्यात येतात. मात्र त्यावर सामान्यांकडून याबाबत लिखित-अलिखित नियम पाळले जात नाहीत. अशावेळी हेमांगीची ही पोस्ट या समाजकंटकांसाठी एक चपराक आहे. याबाबत अनेकांनी विचार करणे गरजेचे आहे. (हे वाचा-'सुशांतच्या आयुष्यातील मोठे निर्णय रिया घ्यायची', श्रुती मोदीचा ED समोर खुलासा) हेमांगीने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिला याबाबत चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक चाहते आणि कलाकार तिच्या पाठिंब्यात उभे राहिले आहेत. तिच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक यावेळी करण्यात येत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या