मुंबई, 21 मार्च : 70 आणि 80च्या दशकातील सुपरस्टार जितेंद्रने आपली बालमैत्रीण शोभा कपूरबरोबर लग्न केलं. दोघांचं लग्न मोठ्या धुमधडाक्यात झालं. बॉलिवूडमध्ये दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. पण तुम्हाला माहितीये का शोभा कपूरबरोबर लग्न करण्यासाधी जितेंद्र ड्रीम गर्ल हेमा मालिनीबरोबर लग्न करणार होते. मद्रासमध्ये दोघांचं लग्न होणार होतं पण अभिनेते धर्मेंद्र त्या ठिकाणी पोहोचले आणि हेमा मालिनी आणि जितेंद्र यांचं लग्न होता होता राहिलं. अभिनेत्री हेमा मालिनी हिनं तिच्या हेमा मालिनी: बियॉड्न द ड्रीम गर्ल या बायोग्राफीमध्ये देखील हा किस्सा सांगितला आहे.
अभिनेते धर्मेंद्र यांचं आधीच एक लग्न झाल्यानं हेमा मालिनीच्या घरचे दोघांच्या लग्नाला तयार नव्हते. यावेळेस हेमा मालिनीच्या घरच्यांनी तिचं लग्न जितेंद्रशी लावण्याचा निर्णय घेतला. जितेंद्र यांच्या मनात हेमा यांच्याविषयी आधीपासून सॉफ्ट कॉर्नर होता. पण हेमा मालिनी यांनी कधी त्यांना तितका भाव दिला नाही. पण कालांतरानं दोघे चांगले मित्र मैत्रीणी झाले.
हेही वाचा - कधीकाळी टेलिव्हिजनवर केलंय अधिराज्य; आज अभिनेत्रीला कोणी काम देईना, Reels वर काढतेय दिवस
जितेंद्र आणि हेमा मालिनी यांची मैत्री धर्मेद्र यांना आवडत नव्हती. रागानं एकदा धर्मेंद्र यांनी सिनेमाच्या सेटवर खूप हंगामा केला होता. त्यानंतर हेमा मालिनीच्या आईनं लवकरात लवकर जितेंद्रच्या आई वडिलांना भेटण्यासाठी तयार केलं. जितेंद्रच्या घरचे हेमा आणि जितेंद्रच्या लग्नामुळे खुश होते. दोघांच्या लग्नाची बातमी मीडियामध्ये येऊ लागली आणि धर्मेंद्र यांना कळली.
हेमा आणि जितेंद्र यांच्या लग्नाची बातमी धर्मेंद्र यांना कळताच ते दोघांचं लग्न मोडण्यासाठी मद्रासला पोहोचले. भर मंडपात धर्मेद्रला पाहून हेमा मालिनीच्या वडिलांचा पारा चांगलाच चढला आणि त्यांनी धर्मेंद्रला तिथून जाण्यास सांगितलं. पण धर्मेंद्र कोणाचंही काहीच ऐकलं नाही. त्यानंतर त्यांनी हेमाबरोबर एकट्यात बोलण्याची विनंती केली. हेमाच्या वडिलांनी मुलीला धर्मेंद्रला थोडा वेळ भेटण्याची मुभा दिली.
असं म्हणतात की, धर्मेंद्रला भेटल्यानंतर हेमा मालिनीनी आई वडिलांकडे लग्नाचा विचार करण्यासाठी वेळ मागितला. हेमा मालिनीचं हे वागणं जितेंद्रच्या घरच्यांना आवडलं नाही त्यांनी रागात येऊन दोघांचं लग्न मोडलं. ठरलेलं लग्न मोडल्यानं अभिनेता जितेंद्रची खूप बदनामी झाली ते आपल्या घरच्यांसह लग्न सोडून निघून गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News