कमला मिल अग्नितांडव : मुंबईत लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं पाहिजे-हेमामालिनी

कमला मिल अग्नितांडव : मुंबईत लोकसंख्येवर नियंत्रण ठेवलं पाहिजे-हेमामालिनी

" मुंबईत आता इतकी लोकसंख्या वाढली आहे की मुंबईतच आणखी एक मुंबई तयार होत आहे. खरंतर मुंबईच्या बाहेर अशीच मुंबई तयार केली पाहिजे"

  • Share this:

28 डिसेंबर :  मुंबईच्या बाहेर आणखी एक मुंबई उभी राहणे गरजेच असताना मुंबईतच आणखी एक मुंबई उभी राहत आहे, मुंबईत लोकसंख्येवर नियंत्रण असायला हवंय अशी प्रतिक्रिया भाजपच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिली. हेमामालिनींनी अप्रत्यक्षपणे कमला मिल अंग्नितांडव प्रकरणाला मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला जबाबदार धरलंय.

कमला मिलमधील हॉटेल मोजोस लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झालाय. तर 21 हुन जास्त लोकं जखमी झाले आहे. या दुर्घटनेबाबत सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त केलंय जातंय. संसदेबाहेर हेमामालिनी यांचा प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येलाच या घटनेसाठी जबाबदार धरलंय.

जर एखादी वास्तू तयार करायची असेल तर तिथे जाण्या येण्यासाठी मोकळी जागा आहे की नाही हे पाहणे गरजेचं आहे. मुंबईत आता इतकी लोकसंख्या वाढली आहे की मुंबईतच आणखी एक मुंबई तयार होत आहे. खरंतर लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईच्या बाहेर अशीच मुंबई तयार केली पाहिजे आणि लोकसंख्येवर नियंत्रण कसे ठेवणार याकडे लक्ष्य दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया हेमामालिनींनी दिली. हेमामालिनींच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे.

कमला मिलमधील रस्ते म्हणजे भूलभुलैया-जया बच्चन

मी सुद्धा अनेक वेळा कमला मिलमध्ये गेली होते. पण तिथे खूप अरूंद रस्ते आहे, याबद्दल व्यवस्था ठेवली पाहिजे. ही घटना दुर्दैवी आहे. मुळात कमला मिल ही कमर्शियल जागा आहे. तिथे हाॅटेल्सला लायसन्स देण्याआधी चौकशी करायला हवी होती अशी नाराजी जया बच्चन यांनी व्यक्त केली.

मुंबईत सगळ्याचं ठिकाणी लक्ष ठेवणे अशक्य -महापौर

दरम्यान, मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही वादग्रस्त व्यक्तव्य केलंय. कमला मिल दुर्घटना ही मोठी असून दुर्दैवी आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे.

चौकशीनंतर जे दोषी आढळतील त्यांची गय केली जाणार नाही. पण मुंबईत सगळीकडे लक्ष ठेवणे हे शक्य नाही, आम्ही सगळ्याचं ठिकाणी पोहोचू शकत नाही अशी प्रतिक्रिया महाडेश्वर यांनी दिली.

=================================================================

संबंधित बातम्या

=================================================================

कमला मिल अग्नितांडवानंतर....

कमला मिल अग्नितांडव : पाचगणीला जाण्याआधीच त्यांना गाठलं मृत्यूनं

कमला मिल अग्नितांडव- राहुल गांधींनी मराठीतून ट्विट करून दिली मृतांना श्रद्धांजली

कमला मिल अग्नितांडव : मृत्यूपूर्वी विश्व आणि धैर्यने वाचवले अनेकांचे प्राण

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचं यशाचं स्वप्न अधुरंच राहिलं

कमला मिल कम्पाऊंडमध्ये रात्रभर चाललेल्या अग्नितांडवाचा घटनाक्रम

कमला मिल अग्नितांडवात वन-अबव्ह आणि मोजोस या पब मालकांवर गुन्हा दाखल

धुरामुळे हात सुटला, आई गेली आणि मुलगी वाचली

कमला मिल कम्पाऊंडच्या अग्नितांडवाचे भीषण फोटो

कमला मिल कम्पाऊंडमध्ये अग्नितांडव, १४ मृत्युमुखी

=================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2017 06:49 PM IST

ताज्या बातम्या