मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Hema Malini on Kangana Ranaut : कंगनाला मिळणार मथुरेचं तिकिट? हेमा मालिनी म्हणाल्या, 'मग राखी सावंतलाही...

Hema Malini on Kangana Ranaut : कंगनाला मिळणार मथुरेचं तिकिट? हेमा मालिनी म्हणाल्या, 'मग राखी सावंतलाही...

हेमा मालिनी कंगना राणौत

हेमा मालिनी कंगना राणौत

2024च्या लोकसभा निवडणूकीबाबत खासदार हेमा मालिनी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,  24 सप्टेंबर: सध्या देशाच्या राजकारणार 2024मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी त्यांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे अनेक  नेते विविध राज्यांचा दौरा करत आहेत.उत्तर प्रदेश राज्यात सर्वत्र भाजपचाच बोलबाला पाहायला मिळतोय. अशातच अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी मथुरा दौऱ्यावर पोहोचल्या. याच दरम्यान त्यांना कंगनाला मधुरा लोकसभा मतदार संघातून भाजप तिकीट देणार असा प्रश्न विचारला गेला. मधुरा दौऱ्यावरील हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हेमा मालिनी या मधुरेच्या खासदार आहेत.त्यामुळे त्या वरेचेवर तिथे येत जात असतात.

यावेळी कंगनाच्या निवडणूक तिकिटीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर हेमा मालिनी म्हणाल्या, 'चांगली गोष्ट आहे. माझे विचार देवावर निर्भर आहेत. कोणी चांगला माणूस मधुरेचा खासदार कशाला पाहिजे. त्या चांगल्या व्यक्तीला तर तुम्ही खासदार होऊच देणार नाही. तुम्हाला तर मधुरेत फिल्म स्टार पाहिजे. मग राखी सावंतलाही आम्ही पाठवतो निवडणूकीत तीही जिंकेल'.

हेही वाचा - Falguni Pathak VS Neha Kakkar: नेहा कक्करवर केस करणार फाल्गुनी पाठक? काय आहे नेमकं प्रकरण?

अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसात अनेक वेळा मधुरेत आली आहे. काही दिवसांआधी ती तिच्या कुटुंबाबरोबर वृंदावनला आली होती. तिथं तिनं बांके बिहारी मंदिराचं दर्शन घेत पूजा-अर्चा केली.  तेव्हा मीडियाशी बोलताना कंगना म्हणाली होती की, 'आपलं भाग्य आहे की आपल्याला भगवान कृष्ण आणि राधे माँला एकत्र पाहण्याचं सौभग्य मिळालं आहे'.

त्यानंतर कंगना तिच्या इमरजन्सी सिनेमाचं शुटींग संपल्यानंतरही भगवान कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी आली होती. पण तेव्हा मात्र तिनं राजकारणाशी निगडीत प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं होतं.

मथुरेत सध्या कंगना निवडणूकीला उतरण्याची चर्चा असली तरी याआधी लोकसभेत भाजपच्या तिकीटावर हेमा मालिनी दोन वेळा निवडणूक जिंकल्या आहेत. 2014मधअये त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर 2019ची निवडणूकही त्यांनी जिंकली होती.

First published:

Tags: Bollywood News, Election