बर्थ डे स्पेशल-...म्हणून 'ड्रीमगर्ल' हेमा मालिनीला घ्यावा लागला होता बी ग्रेड सिनेमांचा आधार

बर्थ डे स्पेशल-...म्हणून 'ड्रीमगर्ल' हेमा मालिनीला घ्यावा लागला होता बी ग्रेड सिनेमांचा आधार

पद्मश्री हेमा मालिनीचा सिनेसृष्टीतला यशस्वी प्रवास आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यांच्या आयुष्यात काही कठीण क्षणही आले.

  • Share this:

16 आॅक्टोबर : किसी शायर की गझल ड्रीमगर्ल, किसी झील का कमल ड्रीमगर्ल... हेमा मालिनीच्या सौंदर्याला साजेसं हे गाणं. हेमा मालिनींनी आपल्या सगळ्यांना त्यांच्या अदाकारींनी नेहमीच भुरळ पाडली. त्याच ड्रीमगर्ल हेमा मालिनीचा आज 69वा वाढदिवस आहे. पण या वयातही त्यांच्या सौंदर्यात काहीही फरक पडलेला नाही. 1972मधली नटखट 'गीता',  2003 मधली 'बागबान'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या पत्नीच्या भूमिकेतही तितक्याच सुंदर दिसत होत्या.

पद्मश्री हेमा मालिनीचा सिनेसृष्टीतला यशस्वी प्रवास आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण त्यांच्या आयुष्यात  काही कठीण क्षणही आले.

ही गोष्ट त्याकाळातली आहे ज्या काळात त्यांची पहिली प्रसुती झाली आणि त्यानंतर त्या कामाच्या शोधात होत्या. त्याच दरम्यान इन्कम टॅक्स डिर्पाटमेंटने त्यांना नोटीस पाठवली. यात त्यांना 1 कोटी रुपये जमा करायचे होते. पण एवढी मोठी रक्कम जमा करून टॅक्स भरणं त्यांच्यासाठी कठीण होतं. यात त्यांना धर्मेंद्र यांची मदत घ्यायची नव्हती. अगदी त्याच काळात त्यांनी त्यांच्या वडिलांनाही गमावलं होतं. मोठ्या भावाची बदली कोलकत्याला झाली होती. छोट्या भावचा बिझनेस मंदीत चालू होता.

त्यांनी मुंबईला बदली करून घेतली. इन्कम टॅक्स क्षेत्रातील तज्ज्ञांना गाठून समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयन्त केला. यात त्यांच्या लक्षात आलं की पेनल्टी भरल्याने प्रॉब्लेम कमी होईल, पण त्यासाठीही पैशांची गरज होती. एवढ्यातच त्यांच्या आयुष्याला वळण देणारा क्षण आला. श्याम रलहन यांनी 'रामकली' या बी ग्रेड सिनेमाची ऑफर केली. यात त्यांचा डबल रोल होता. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी हा सिनेमा साइन केला. परंतु आपली प्रतिमा लक्षात ठेवून हेमा यांनी श्याम रलहन यांना शहराच्या बाहेर असलेल्या छोट्या सिनेमागृहांमध्ये सिनेमाची पोस्टर्स लावण्यास सांगितले होते.

या सिनेमाच्या यशानंतर अनेकांनी त्यांना सिनेमासाठी ऑफर्स दिल्या. त्यासाठी अनेक चित्रपट निर्माते त्यांच्या घरी येऊ लागले.  हे त्यांना अजिबात आवडायचं नाही पण त्यांचाही नाईलाज होता. आपल्या नाईलाजाखातर त्यांनी सिनेमांसोबतच डान्स शो देखील केले. अखेर 10 वर्षांच्या कठीण परिश्रमानंतर त्यांना पेनल्टी भरण्यात यश आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2017 12:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading